Header Ads Widget

लोहा पोलीस स्टेशन तर्फे हवेत गोळीबार, दोन राऊंड फायर, अश्रुधुर नळकांड्या व हॅन्डग्रेनेड फोडले - पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांची माहिती !!

         माधव पवार
लोहा येथील छत्रपती शिवाजी चौकामध्ये पोलिसांनी प्रत्यक्षरीत्या स्पॉटवर प्रात्यक्षिक राबविले, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी लोहा पोलिसांनी जमाव पांगवताना करण्यात येणारी संपूर्ण प्रक्रिया  राबविली.

 सदर वेळी मॉब डिस्पोजल प्रॅक्टिस चे कमांडर म्हणून पीएसआय हालसे यांनी कामकाज पाहिले, मॉब डिस्पोजल करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व साहित्यासह यावेळी पोलिसांनी प्रात्यक्षिक केले.
 यामध्ये गावातील काही नागरिक काही पोलीस काही होमगार्ड यांचा मॉब म्हणून वापर करण्यात आला, मॉब भडकाऊ नारे देत असून अग्रेसिव्ह होऊन दगडफेक करत होता
त्यामुळे प्रथम लांब रेंजच्या अश्रू धुरांच्या नळकांड्या दोन फोडण्यात आल्या, मग जवळ आल्यानंतर हाताने फेकण्याचे दोन अश्रुदुराचे हॅन्ड ग्रेनेड मॉब वर फेकण्यात आले, सदर वेळी मॉब वर पोलिसांकडून लाठी चार्ज करण्यात आला तर शेवटी हवेमध्ये दोन राऊंड फायर करण्यात आले, मॉब डिस्पोज झाल्यानंतर जखमींना  दवाखान्यात दाखल करण्यात आले, तर काही जणांना अटक करून पोलीस स्टेशनला नेण्यात आले.

सदर कारवाई मध्ये 30 पोलिसांनी सहभाग घेतला होता यामध्ये दोन अश्रूधोर नळकांड्या दोन हॅन्डग्रेनेड दोन रबरी बुलेट वापरण्यात आले.

अशा प्रकारची संपूर्ण कारवाई पोलीस निरीक्षक चिंचोलकर साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये सपोनी चन्ना, पीएसआय हालसे, नाईक,सोनकांबळे व काळे मॅडम यांच्यासोबत  लोहा पोलीस स्टेशन येथील अमलदार होमगार्ड व कंधार माळाकोळी उस्मान नगर येथील पोलीस यांनी मिळून केला.

 यादरम्यान पोलिसाकडे असलेले कोणकोणते हत्यार किती दूरपर्यंत मारा करू शकतात, कुठले हत्यार चालतात, कुठले हत्यार कोणत्या स्थितीत आहेत याची पण पाहणी करण्यात आली तसेच पोलिसांनी योग्य बळाचा वापर कसा करावा कायद्याने पोलिसांना दिलेला लाठी चार्ज व इतर अधिकार कसे वापरावे व ते कसे चालवावे याचे प्रशिक्षण देऊन सूचना देण्यात आल्या.

 सदरचे प्रात्यक्षिक हे लोहा येथील महत्त्वाच्या आणि मोठ्या चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पोलिसांनी घेतले, सदरचे प्रात्यक्षिक एक तास चालले यावेळी चौकामध्ये सदरचे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती.
 सदर प्रात्यक्षिकादरम्यान पोलीस निरीक्षक यांचे विनंतीवरून मा. तहसीलदार लाड साहेब यांनी सहभाग घेतला व तालुका दंडाधिकारी या नात्याने मॉफ डिस्पोजल संबंधाने योग्य ते आदेश दिले.

Post a Comment

0 Comments