हिमायतनगर : नागोराव शिंदे :
राज्यातले राज्य सरकार ऐनवेळी कोणते निर्णय घेईल यांचा अंदाज जनसामान्य माणसाला लागत नसल्यामुळे आत्ता काकत कळसा गावाला वळसा म्हणण्याची जनसामान्य माणसावर वेळ आली आहे
सरकार आता गॅस साठी सुद्धा केवायसी करण्यासाठी बंधनकारक असल्याचे सांगत असल्यामुळे जनसामान्य शेतकऱ्यांसह गोरगरीब लोक हातावर पोट घेऊन दैनंदिन काम करीत असतात त्या लोकांना नेमके केवायसी म्हणजे काय असा प्रश्न सध्या तरी चर्चेला जात आहे
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी आता यापुढे राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मध्ये प्रवास करणाऱ्या हाफ तिकीट वाल्यांना सुद्धा यापुढे केवायसी करायला लावणार का ? असा प्रश्न सदरच्या हाफ तिकीट धारकांना पडला आहे
तालुक्यातील सर्व गॅस धारकांनी आपल्या गॅस कार्डची केवायसी करून घेणे बंधनकारक असल्याचे तेल आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सूचनेवरून आपल्या कार्डाची केवायसी दिनांक.३१ डिसेंबर २०२३ पर्यंत इ केवायसी करून घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे
यासाठी आपले गॅस कार्ड आधार कार्ड बँक पासबुक ओरिजनल सोबत घेऊन कल्पक एचपी गॅस एजन्सी हिमायतनगर येथे जाऊन आपली केवायसी करून घ्यावी अशी माहिती कल्पक गॅस एजन्सी चे संचालक प्रवीण कुमार जनावार यांनी नायगाव फास्ट न्यूज शि बोलताना सांगितले बोलताना सांगितले आहे

0 Comments