Header Ads Widget

घुंगराळ्याच्या खंडोबा मंदिरासह एका शटरची चोरी उघड केल्यामुळे सपोनि बहातरे यांच्यासह जमादार पवार पो कॉ घुमे यांचा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या वतीने विशेष सन्मान

          माधव पवार
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या घुंगराळ्याच्या खंडोबा मंदिरासह एका शटरची चोरी उघड केल्यामुळे सपोनि बहातरे यांच्यासह जमादार पवार पो कॉ घुमे यांचा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या वतीने विशेष सन्मान  करण्यात आहे
तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या घुंगराळा येथील खंडोबा मंदिरात चोरी करण्यात आली होती त्याच बरोबर एका नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असलेल्या एका मल्टी सर्विसेस दुकानाचे शटर तोडून चोरी केल्या प्रकरणी यातील आरोपीला ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहायक पोलीस निरीक्षक विशाल बाहातरे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार आर टी पवार पोलीस कॉन्स्टेबल अशोकराव घुमे यांनी तपास करून आरोपीला जेरबंद करण्यात केले होते

पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या आदेशानुसार बिलोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या सूचनेनुसार कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बहातरे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार आर टी पवार व पोलीस कॉन्स्टेबल अशोक घुमे यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्या बद्दल पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या वतीने विशेष कौतुक करण्यात आले आहे

कुंटूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहायक पोलीस निरीक्षक विशाल बहातरे त्याच बरोबर आर टी पवार व घुमे यांनी भविष्यात असेच उत्कृष्ट कर्तव्य / कामगिरी बजावून महाराष्ट्र पोलीस दलाच्या परंपरेत भर टाकतील असी अपेक्षा नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी अशा व्यक्त केली आहे 





Post a Comment

0 Comments