Header Ads Widget

सरसम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आशा वर्कर पदावर कायम ठेवण्याची मागणी.


हिमायतनगर : नागोराव शिंदे :-

तालुक्यातील सरसम  बु.  येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पवना येथे आशा वर्कर पदावर मला कायम ठेवून सेवा करण्याची संधी देऊन, सेवेत कायम ठेवावे.  अशी मागणी पुष्पावती लक्ष्मण वानखेडे यांनी  केली आहे. 

तालूका आरोग्य अधिकारी हिमायतनगर यांना दिलेल्या निवेदनात वानखेडे पुष्पावती लक्ष्मण यांनी म्हटले आहे की,  गेल्या १५ वर्षांपासून मी पवना येथे आशा वर्कर म्हणून सातत्यानं काम करीत आलेलो आहे

कोरोणा सारख्या अतिशय अवघड काळात जिवाची पर्वा न करता मी सेवा बजावलेली आहे.  परंतू मला डावलून दुसर्‍याच महिलेला संधी दिली असल्याचे मला समजले आहे.  मला अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारचे मानधन ही दिले गेले नाही. परंतू मी सेवा करीत आलेलो आहे

मला न्याय अपेक्षित आहे. मात्र न्याय मिळालाच नाही तर लोकशाही मार्गाने आमरण ऊपोषण करण्यात येईल. असा इशारा वानखेडे पुष्पावती लक्ष्मण यांनी  निवेदनात. दिला आहे.

Post a Comment

0 Comments