राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा पक्षाचे अध्यक्ष शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिनांक १७ सप्टेंबर २०२३ रोजी नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील मौजे बरबडा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नायगाव तालुका अध्यक्ष विश्वनाथ दिगंबरराव बडूरे यांच्या नेतृत्वाखाली भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नायगाव फास्ट न्यूशी बोलताना दिली आहे
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील मौजे बरबडा नगरीत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याने या सदरच्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी विशेष मान्यवरांची उपस्थिती राहणार असून या भव्य रक्तदान शिबिरात जिल्ह्यातील व तालुक्यातील रक्तदात्यांनी रक्तदान देऊन शासन दरबारी महत्त्वाचा संदेश द्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नायगाव तालुका अध्यक्ष विश्वनाथ बडुरे यांनी केले आहे
नायगाव तालुक्यात रक्तदान हे श्रेष्ठदान असल्यामुळे रक्तदान करते मोठ्या प्रमाणात रक्तदान देऊन महाराष्ट्र शासनाला वेगळा संदेश देतात त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदात्यांनी रक्तदान देऊन मोठ्या प्रमाणात सहकार्य करतील अशी अपेक्षा ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नायगाव तालुका अध्यक्ष विश्वनाथ बडूरे यांनी व्यक्त केली आहे

0 Comments