Header Ads Widget

शेतकरी नेते कवळे गुरुजी यांच्या संकल्पनेतून दीपावलीच्या निमित्ताने पत्रकाराचा विशेष सन्मान !!

                माधव पवार 
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे तथा स्वतःच्या कौशल्यातुन राज्यात नव्हे तर इतर राज्यात सुद्धा त्यांची ख्याती निर्माण करणारे एक उदयोजक नांदेड जिल्ह्याच्या नायगाव विधानसभा मतदार संघाचे भावी आमदार म्हणून चर्चेत असलेले चेअरमन एम व्ही के. उद्योग समूह प्रदेश कार्यकारणी सदस्य महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीचे मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांनी सदरील कार्यक्रमाचे केले आहे
शेतकरी नेते कवळे गुरुजी यांच्या संकल्पनेतून शुभ दीपावलीच्या निमित्ताने नायगाव उमरी धर्माबाद तालुक्यातील विविध वर्तमान पत्रातील युट्युबच्या माध्यमातून काम करणाऱ्या त्याच बरोबर चॅनलवर काम करीत असलेल्या पत्रकाराचा विशेष सन्मान करण्यात आला असून यावेळी पत्रकाराना पांढरी दस्ती दीपावलीच्या निमित्त किट देण्यात आले साखर खवा तूप बोटव्या तेल आदी खाद्य देऊन सन्मान केला आहे

शेतकरी नेते कवळे गुरुजी एक सुजळ नेतृत्व 

सदरील आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने नायगाव विधानसभा मतदार संघाचे भावी आमदार तथा उद्योजक आणि शेतकरी नेते कवळे गुरुजी यांच्या कार्यांचा व त्यांच्या स्वभावातील गुणांचा काही पत्रकारांनी मोठा आवर्जून उल्लेख करीत यावेळी पत्रकारांच्या वतीने सुद्धा दीपावलीच्या निमित्ताने कवळे गुरुजींना भावी कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आले आहेत 

मानवतेचा आकाश दिवा लावुनी रेखाटूया धर्मनीरपेक्षतेची रांगोळी सु संस्कारच्या पेटवूनी पणत्या प्रत्येका हदयी साजरी करू दिवाळी या महत्वकांक्षी संकल्पनेतून या नायागांव विधानसभा मतदार संघातील पत्रकाराचा सन्मान गौरव केला आहे

Post a Comment

0 Comments