नायगाव तालुक्यात सह ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या कापसावर लाल्या रोग करप्या रोग बोंड आळीचा रोग पडला असल्यामुळे शेतकऱ्यांच्या कापसाचे मोठे नुकसान होत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे
शासनाने तात्काळ शेतकऱ्यांच्या कापसाचे पंचनामे करण्यासाठी तलाठी मंडळ अधिकाऱ्यांना सूचना द्यावेत अशी शेतकऱ्यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहे
तालुक्यातील खेड्यापाड्यात असलेल्या रुई परिसरातील शेतकऱ्याची कापसाचे पिकांची लागवड केली होती परंतु गेल्या एक ते दीड महिन्यापासून पाऊस पडला नसल्याने शेतकऱ्यांच्या कापसावर लाल्या रोग पडला आहे त्या रोगाचा फटका जण सामान्य शेतकऱ्याला बसत असल्यामुळे महाराष्ट्र शासनानी सदरच्या शेतकऱ्यांचे पंचनामे करावे व त्यांना आर्थिक मदत मिळून द्यावी अशी मागणी गजानन पांडुरंग गंगातीरे रुईकर यांनी केली आहे
खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांच्या कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव शासनाने पंचनामे करावे शेतकऱ्यांची मागणी करण्यात येत असून या गंभीर बाबीची दखल घेऊन नायगावच्या तहसीलदाराने पंचनामे करण्यासाठी तलाठी व मंडळाधिकारी यांना आदेशित करावे अशी अशी मागणी जोर धरीत आहे

0 Comments