Header Ads Widget

पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांचा लोहा पोलीस ठाण्याचा कार्यकाळ पूर्ण करण्याची संधी पोलीस अधीक्षकानी द्यावी सुज्ञान नागरिकाची मागणी !!

          माधव पवार
पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांचा लोहा पोलीस ठाण्याचा कार्यकाळ पूर्ण करण्याची संधी पोलीस अधीक्षकानी द्यावी सुज्ञान नागरिकाची मागणी करण्यात येत आहे 

गेल्या काही महिन्या पासून लोहा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले व नांदेड जिल्ह्यचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे व उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे आदेशानुसार नुसार ठाण्याचा पदभार सांभाळत असलेले दबंग पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांचा लोहा पोलीस ठाण्याचा कार्यकाळ पूर्ण करण्याची त्याना संधी देण्यात यावी या मागणीसाठी काही सुज्ञान नागरिकानी पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन विनंती केली आहे

नांदेड जिल्ह्यातील लोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी मराठा आरक्षण असो की गणेशोत्सव असो महा पुरुषाच्या जयंती सोहळा असो अथवा पोळ्याचा सण असो की रमजान ईद असो अथवा बकरी ईद असो इतर धार्मिक उत्सव असो या संदर्भात मोठया प्रमाणात पोलीस अधिकारी म्हणून कर्तव्य काय असते हे लोकांना पोलीस ठाण्यात बोलावून शांतता कमिटीच्या बैठका घेऊन शांतते उत्सव साजरे करण्यासाठी प्रयत्न केले आहे

काही वर्तमान पत्रासह शोशीयल मीडियावर खोडसाळ काही बातम्या प्रकाशित करण्यात आल्या होत्या त्या बातम्या काही तथ्य नसल्याचे लक्षात आल्याच्या नंतर काही सुज्ञान नागरिकानी थेट पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना निवेदन देऊन असे कळविले की लोहा पोलीस ठाण्याचे दमदार पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांचा नियमानुसार कार्यकाळ याच ठाण्यात करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे 




Post a Comment

0 Comments