नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर तालुक्यातील एकंबा शिल्लोड पळशपूर शीरपल्ली डोलारी या रस्त्याचे प्रलंबित काम पडले असल्यामुळे ते तात्काळ चालू करण्यात यावा या मागणीसाठी या तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी व सुज्ञान नागरिकांनी धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला असेल सदरचे काम तात्काळ चालू करा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात येत आहे
हिमायतनगर तालुक्यातील सदरच्या रस्त्याचे काम एका गुत्तेदारा मार्फत करण्यात आले होते ते काम अध्याप पूर्ण झाले नसल्यामुळे गुत्तेदाराने व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन सदरच्या रस्त्याचे काम लवकर मार्गी लावा अशा पद्धतीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले असल्याची माहिती नायगाव फास्ट न्यूज हिमायतनगर येथील पत्रकार यांनी कळविले आहे
संबंधित विभागाचे अधिकारी व गुत्तेदार यांच्या संगणमतांनी सदरचे काम स्तगीत ठेवण्यात आले की काय असा प्रश्न उपस्थित केला जात असला तरी सदरचे काम तात्काळ करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे

0 Comments