Header Ads Widget

बस स्टॅन्डवर खुलेआम लघुशंका करणाऱ्या 9 जनावर लोहा पोलिसात गुन्हे दाखल महिला व शाळेतील विद्यार्थिनींना होणाऱ्या त्रासाची लोहा पोलिसांनी घेतली दखल - पोलीस निरीक्षक चिंचोलकर

          माधव पवार
लोहा येथील बसस्थानकाच्या खुल्या जागेमध्ये सर्वांना दिसेल अशा पद्धतीने लघुशंका करणाऱ्या ९ व्यक्ती विरोधात लोहा पोलिसांनी आज रोजी गुन्हे दाखल केले आहेत अशी माहिती लोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी दिली आहे लोहा येथील बस स्टॅन्ड वर मोठ्या प्रमाणात वरदळ असते त्यातच गावातील लोक पण त्या ठिकाणी बसायला फिरायला नेहमीच जातात, लोहा येथील बस स्थानकामध्ये वॉशरूमची व्यवस्था केलेले असून पक्के बांधकाम केलेले आहे, तरीपण त्या वॉशरूम चा वापर न करता अनेक जण बस स्टॅन्ड मधील बस थांबतात त्याला लागूनच मोकळ्या जागेमध्ये लघुशन्का करत आहेतलोहा बस स्टॅन्ड येथे मोठ्या प्रमाणात महिला प्रवासी शाळेतील विद्यार्थिनी ये जा करतात तसेच अनेक वेळा बस येईपर्यंत बस स्टॅन्ड मध्ये थांबून असतात. येणाऱ्या जाणाऱ्या प्रवासी त्यांच्या दृष्टीस पडेल अशा पद्धतीने निर्लज्जपणे अनेक लोक बस स्टँड मधील मोकळ्या जागेमध्ये लघुशंका करतात, सदरची बाब ही अत्यन्त वाईट असून महिलांना त्रास दायक होती

त्यामुळे सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण झाला होता
यावर लोहा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी कडक कारवाई करून सार्वजनिक ठिकाणी लघुशन्का करणाऱ्या ९ व्यक्तीस ताब्यात घेऊन त्यांना पोलीस स्टेशन येथे नेवून त्यांच्या वर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९४९ कलम ११५,११७ प्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत

         लोहा  : पोलिसांचा अनेकांना चोप ? - 

लोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर याने सार्वजनिक ठिकाणी उभे टाकून लघुशंका करत असताना लोहा येथील बस स्टँड मध्ये जाऊन अनेकांना चांगलाच जोक दिला असल्याची माहिती असून गैर कायद्याच्या मंडळीला कायदा शिकविण्याची सबक लोहा पोलिसांनी दाखवून दिली आहे 

 

Post a Comment

0 Comments