लोहा पोलीस स्टेशन तर्फे अवैद्य धंद्यावर सलग मोहीम सुरु लोहा पोलीस स्टेशन मध्ये एक अवैध दारूचा गुन्हा महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम प्रमाणे दाखल करण्यात आला आहे
अवैधपणे रस्त्यावर गाड्या व गाडे लावून रहदरीस अडथळा करणाऱ्या वर भारतीय दंड विधान २८३ प्रमाणे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली
तर अवैधपणे वाहन चालविणे वाहनांचे कागदपत्र नसणे अस्ताव्यस्त वाहन पार्किंग करणे अशा ८० वाहन धारकांवर कारवाई करून ५३ हजार ९५० रुपयांचा दंड आकारण्यात आला असल्याची पोनि चिंचोलकर यांनी माहिती दिली आहे

0 Comments