नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या आदेशानुसार लोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी अवैध धंदे करणाऱ्यासह अवैध वाहतूकदार नियमाचे उल्लंघण करणाऱ्या ८६ वाहन धारकावर कारवाई करून ५२ हजार ७०० रुपयाचा दंड आकारण्यात आल्याची माहिती पोनि चिंचोलकर यांनी दिली आहे
जिल्ह्यातील लोहा पोलीस ठाण्याचे दमदार पोलीस अधिकारी म्हणून पोनि चिंचोलकर यांना लोहा पोलीस ठाणे बहाल करण्यात आले या पूर्वी नायगाव पोलीस ठाण्याचा कार्यरत असताना सुद्धा वाहतुकीला चांगलीच शिस्त लावली होती
त्याची बदली अवघ्या २५ ते ३० दिवसाच्या आत करण्यात आली होती त्यानंतर वाहतूक शाखेत करण्यात आली त्या पूर्वी लोहा पोलीस ठाण्यात करण्यात आली होती परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यानी चार पाच दिवस नांदेड शहरात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी तात्पुरता चार्ज दिला होता
लोहा पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला तेव्हा पासून आपले कर्तव्य चोक पद्धतीने सांभाळत असून वाहतुकीचे नियम मोडून अस्ताव्यस्त वाहन चालवीणारे कुठे ही रोडवर अवैधपणे वाहन पार्क करणारे विना लायसन ट्रिपल सीट शहरात वाहन चालवणारे शहरामध्ये विनाकारण वाहन घेऊन फिरणारे यांच्यावर करवाई करण्यात आली आहे
शाळा कॉलेज ट्युशन परिसरामध्ये दुचाकी वाहन घेऊन भरकटणारे यांच्यावर लोहा पोलिसांतर्फे कारवाई करण्यात आली सदर कारवाई मध्ये ८६ जनावर कारवाई करून ५२ हजार ७०० रुपयाचा दंड आकारण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी दिली आहे

0 Comments