माधव पवार
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या मौजे बरबडा येथील रहिवासी असलेले जमीलखान शादुलखान पठाण वय ३३ वर्षा यांनी गेल्या काही दिवसाखाली घरा बाहेर जाऊन येतो असे सांगितले होते
परंतु अध्याप घरी परत आला नसल्यामुळे त्यांचा भाऊ अजीमखान शादुलखान पठाण यांनी स्वतः यांनी कुंटूर पोलीस ठाण्यात जाऊन माझा भाऊ दिनांक २ नोव्हेंबर २०२३ रोजी संध्याकाळी अंदाजे ११ वाजून ३० मिनिटांनी मोटार सायकलवर बसून गेला आहे
तो परत आला नसल्यामुळे आमच्या नातेवाईकडे अनेक ठिकाणी शोध घेतला तरी मिळून आला नसल्यामुळे सदरचे पठाण कुटुंब चिंता ग्रस्त आहे
तालुक्यातील बरबडा येथील रहिवासी असलेले जमीलखान पठाण यांच्या सोबत काळ्या रंगाची स्पेंडर प्लस मोटार सायकल असून तिचा क्रमांक एम एच २६ क्यू २५९८ असा असल्यामुळे कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बहातरे यांच्या मार्गदर्शनाखाली बरबडा बिटचे ए एस आय निकाते यांनी सदरील व्यक्तीचा शोध लवकर लागावा म्हणून शोध पत्रिका सर्व पोलीस ठाण्याला स्वाधिन केली आहे
बरबडा येथील जमीलखान पठाण यांचा शोध कुंटूर पोलिसासह त्यांच्या कुटूंबातील व्यक्ती करत असले तरी सध्याच्या परिस्थितीत तो सापडत नाही सदरील जमीलखान पठाण हा लवकर सापडवा म्हणून कुंटूर पोलीस तपास जलद गतीचा चालू केला सदरील तपास हा ए एस आय निकाते करीत आहेत
जमीलखान पठाण यांचे वर्णन
उंची ५ फूट ६ इंच रंग सावळा, बांधा सडपातळ, पायात काळ्या रंगाची चप्पल, पोशाख निळ्या रंगाचा जीन्स पॅन्ट काळ्या रंगाची शर्ट असल्याचे दिलेल्या तक्रारीत म्हटले असून सदरील तरुण हा कोणाला सापडल्यास अथवा दिसल्यास संपर्क करावा असे आवाहन करण्यात येत आहे

0 Comments