नायागांव तालुक्यातील मौजे कृष्णूर येथे नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी बिलोली यांच्या सुचने वरून कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बहातरे यांच्या मार्गदर्शनाखाली कुंटूर पोलिसासह राज्य राखीव पोलीस दलाच्या वतीने पत संचलन करण्यात आले यावेळी बिट जमादार आर टी पवार व घुमे होते
यावेळी एस आर पी एफ जी आर १२ हिंगोलीचे फौजदार गायधने यांच्यासह पांचाळ व व इतर अंमलदार आहेत
तालुक्यातील कृष्णूर येथे मराठा समाजाच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आले होते आंदोलना दरम्यान दगड फिकीचे प्रकार घडल्यामुळे या ठिकाणी भविष्यात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कुंटूर पोलीसासह राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत
कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या कृष्णूर येथे म्हणजे नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर एम आय डी सी असल्या कारणाने या भागात सुद्धा पोलीस गस्त वाढवण्यात आली तर दिनांक ३ नोव्हेंबर २०२३ रोजी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आदेशानुसार रूटमार्च काढण्यात आले आहे
ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या काही ठिकाणी हिंसक वळण लागल्यामुळे पोलिसाना कृष्णूर तगडा पोलीस बंदोबस्त ठेवावा लागला असल्यामुळे इतर काही अनुचित प्रकार घडू नये गावांत पत संचालन करण्यात आले अशी माहिती मिळाली आहे

0 Comments