काही दिवसात मोठया थाटामध्ये दीपावलीचा सण येत आहे त्या निमित्त मोठ्या प्रमाणात बाजारात म्हणजे दुकान दार मिठाईची विक्री करीत असतात या मध्ये मुख्य तो करून पेढा खवा पनीर बर्फी यांचा समावेश मोठया प्रमाणात आहे
अनेक व्यापारी किंवा समाज कंटक स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अशा पदार्थांमध्ये इतर घातक पदार्थ मिक्स करून भेसळ युक्त विक्री करण्याचा संभव असल्यामुळे खबरदार दुकानदारानो भेसळ युक्त विक्री केलात तर असा लोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांच्या वतीने दुकानदाराला इशारा देण्यात आहे
अनेक वेळा बॅन केलेले कलर याच्या मध्ये वापरले जातात तसेच वेगवेगळे पदार्थ टाकून हे पदार्थ डुप्लिकेट बनवले जातात याला आळा बसण्यासाठी पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी आता दुकानदाराकडे लक्ष केंद्रित केले आहे
असा प्रकार लोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत म्हणजे शहरात होता कामा नये जर झाल्यास त्यांच्यावर थेट पोलीस कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहे
थोड्याफार आर्थिक फायद्यासाठी सामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळ केला जातो अशा पद्धतीने भेसळ केल्यामुळे किंवा बनावटी करण केल्यामुळे अनेकांना कॅन्सर अल्सर यकृतचे आजार स्किनचे रोग होत आहे
अनेक वेळा दीपावलीचा फायदा घेऊन एक्सपायरी झालेल्या वस्तू पण विकल्या जातात दिवाळीच्या धामधूम मध्ये आणि आनंदा मध्ये सामान्य माणूस या गोष्टीकडे पाहत नाही किंवा त्याची फसवणूक झालेली त्यांना समजत नाही असे सुद्धा त्यानी सांगितले आहे
पोलीस स्टेशन लोहा तर्फे सर्व व्यापाऱ्यांना व माल सप्लायर करणाऱ्यांना सूचना देण्यात आली असून अशा पद्धतीने जर कोणी भेसळ करून विक्री केली किंवा बनावट पदार्थ तयार केला आणि सामान्याच्या आरोग्याची खेळला गेला खबरदार याद राखा अशा व्यापाऱ्यांवर किंवा माल पुरवठा करणाऱ्यांवर किंवा ते बनवण्यावर भारतीय दंड विधान २७२, २७३ प्रमाणे लोहा पोलिसातर्फे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत
सदर मालाच्या सप्लाय संबंधाने आणि अशा बनावटी करणा संबंधाने लोहा पोलिसांनी एका विशेष पथकाची स्थापना केलेली असून लोहा पोलिसांचे सदर बाबीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे पोनि चिंचोलकर यांनी सांगितले आहे

0 Comments