Header Ads Widget

लोहा पोलीसाचे सर्जिकल स्ट्राईक खंजर घेऊन दहशत माजविणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात तर दोन पोलिस जखमी पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांची माहिती

         माधव पवार
नांदेड जिल्ह्याच्या लोहा पोलीस ठाण्याचे दबंग पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोहा पोलीनी केलेल्या थेट सर्जिकल स्ट्राईकच्या कारवाई दरम्यान हातात खंजीर घेऊन दहशत माजविणाऱ्या एका आरोपीला पोलीसानी जेरबंद केले असल्याची माहिती पोनि चिंचोलकर यांनी नायगाव फास्ट न्यूजला दिली असून यात ठाण्याचे दोन कर्तव्यदक्ष पोलीस जखमी झाल्याची माहिती आहे 

जिल्ह्याच्या लोहा पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम कलम  ४ ( २५ ) प्रमाणे तीन आरोपीवर लोहा पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अशी माहिती पोलीसानी दिली आहे 

लोहा कंधार रोडवर तहसील समोर तीन आरोपी मोठा खंजर घेऊन रोडवर फिरून गाड्या अडून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांमध्ये दहशत पसरवीत होते

ही माहिती लोहा पोलिसांना मिळतात तात्काळ लोहा पोलिस चे पोलीस नाईक माधव डफडे, पोलिस अंमलदार नामदेव ईजुलकंठे, वामन राठोड हे घटनास्थळी पोहोचले. तेव्हा आरोपी शिवम हा एका फुटापेक्षा मोठा धारदार चाकू हातामध्ये घेऊन फिरवत होता
पोलिसांनी हातात चाकू घेऊन फिरणाऱ्या व दहशत मजवीणाऱ्या आरोपीस अतिशय सीताफिने पाठलाग करून पकडले व अटक केली.आरोपी च्या हातातील खंजर पोलिसांनी काढून घेऊन जप्त केला.इतर दोन आरोपी वीरेंद्र राजेंद्र नरंगले व सुमित वाघमारे हे घटनास्थळावरून पळून गेले पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

सदरच्या कारवाईमध्ये आरोपीचा पाठलाग करताना आणि आरोपींना पकडताना पोलिस अंमलदार ईजुलकुंटे यांच्या पायाला मार लागला असून पोलीस नाईक डफडे यांच्या हाताला मार लागून कारवाही दरम्यान पोलीस जखमी झाले होते.

सदर प्रकरणी लोहा पोलीस स्टेशन येथे फिर्यादी पोलीस नाईक डफडे त्यांच्या तक्रारीवरून गुरंन २७८ / २०२३ कलम ४/ २५ शस्त्र अधिनियम १९५९ प्रमाणे रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास सहाय्यक फौजदार  बगाडे करीत आहेत.
 पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनावरून पोलीस अंमलदार डफडे ईजुलकुंठे राठोड यांनी ही कारवाई केली असल्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्या लोहा पोलीसाचे अभिनंदन करण्यात येत आहे 

Post a Comment

0 Comments