Header Ads Widget

पुन्हा एकदा दबंग : पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांचे सर्जिकल स्ट्राईक : अनाधिकृत जुगार अड्ड्यावर धाड आठ आरोपींना अटक साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

         माधव पवार
लोहा जुना लोहा शिवारातील एका झाडाखाली अनधिकृतरीत्या पत्यांचा जुगार सुरू असल्याच्या गुप्त माहितीवरून लोहा पोलिसांनी टाकलेल्या धाडीत एकूण ८ आरोपींना ताब्यात घेवून त्यांच्याकडून रोख रक्कमेसह एकूण ३ लाख ३७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून याप्रकरणी लोहा पोलिसात

जुगार प्रतिबंधात्मक कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदरील घटना दि. १० रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली असल्याची माहिती दंबग पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी सांगितले आहे 

मागील अनेक कालावधीपासून लोहा पोलिस ठाणे हद्दीत विविध प्रकारचे अनधिकृत व्यवसाय राजरोसपणे सुरू आहेत. मात्र मागील कांहीं कालावधीपूर्वी लोहा पोलिस ठाण्याचे सूत्र नूतन अधिकाऱ्यांनी घेतल्या पासून बहुतांश अनधिकृत
धंद्यावर अंकुश लागल्याचे दिसून येत आहे

लोहा शहर हे महामार्गावर असल्याने येथे अनेक अवैद्य व्यवसाय बऱ्याच कालावधी पासून राजरोसपणे सुरू असताना नुकतेच नव्याने लोहा पोलिस ठाण्याचा कार्यभार नूतन पोलिस अधिकारी ओमकांत चिंचोलकर यांनी स्वीकारल्यापासून ठाणे हद्दीतील अवैध व्यवसाय कमी झाल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी दि. १० रोजी पोलिसांना खबऱ्या मार्फत माहिती मिळाल्यावरून लोहा पोलिसांनी कारवाई केली आहे 

पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखालील पोलिस पथकाने सायंकाळी सहा वाजताचे दरम्यान जुना लोहा शिवारातील मारोती चव्हाण यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाखाली अनधिकृतरीत्या सुरू असलेला (पत्यांचा डाव ) जुगारावर धाड टाकली. पोलिसांना पाहून पळणाऱ्या जुगाऱ्याना पोलिसांनी पाठलाग करून पकडले. त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा पोलिसांनी हस्तगत केला आहे

पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांच्या परत एकदा केलेल्या सर्जिकल स्ट्राईक मध्ये एकूण ३ लाख ३७ हजार २०० रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला असे पोनि चिंचोलकर यांनी सांगितले आहे 

या प्रकरणी पोहेकॉ चोपवाड यांच्या फिर्यादीवरून आरोपी जमीर लाला मोगल, संभाजी भीमराव कदम, नय्युमखान पठाण, सादत रहीम सय्यद, प्रकाश गंगाधर कदम, दिनेश नागोराव ढाले, तानाजी केरबा सुरनर आदी विरुद्ध जुगार प्रतिबंधात्मक कायद्यान्वये कार्यवाही करण्यात आली. पुढील तपास लोहा पोलिस करत आहेत



Post a Comment

0 Comments