नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय नरंगल येथील सर्व धर्मातील समाज बांधवाच्या वतीने सर्व राजकीय पुढाकाऱ्या गावबंदी करण्याचा निर्णय व ठराव घेण्यात आला असून जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तो पर्यंत सदरच्या विद्यमान पुढाऱ्याना गावकऱ्यानी गाव बंदी केली आहे
लोकशाहीच्या काळात नेत्यावर -?
लोकशाहीच्या काळात लोकशाही मार्गाने सकल मराठा समाजाच्या वतीने मराठ्यांना आरक्षण मिळावे प्रयत्न करीत असताना व कोणताही राजकीय पुढारी मराठा समाच्या मागण्याकडे लक्ष देत नसल्यामुळे मराठा समाजात संतापाची लाट पसरली असून लोकशाही काळात जर राजकीय नेत्याना गावबंदी करण्यात येतं असेल या पेक्षा दुसरे काय दुर्दैव असू शकतो असे तमाम जनतेतून बोलल्या जात आहे
तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथील ग्रामपंचायत कार्यालय नरंगल व सर्व जाती धर्माचे समस्त गावकरी मंडळी एकत्रित येऊन सकल मराठा समाजाच्या वतीने सर्व पक्षाच्या नेत्यांना गावबंदी व मतदानावरती बहिष्कार टाकण्याचा एकमताने ठराव पास करण्यात आला आहे
यावेळी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व सकल मराठा समाज व समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते यावेळी गाव बंदीची शपथ घेऊन छत्रपती शिवरायांचा जयघोष व मनोज पाटील जरांगे यांचा जय घोष करण्यात आला जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे
मतदाना वरती बहिष्कार टाकण्यात आलेला असून एकजुटीचा विजय असो एक मराठा लाख मराठा एक मराठा एक कोटी मराठा आश्या घोषणा देण्यात आल्या आहेत

0 Comments