हिमायतनगर : नागोराव शिंदे :-
नांदेड येथे जलजीवन मिशन अंतर्गत ‘हर घर नल से जल’ या योजनेची जिल्हा परिषद च्या सर्व १६ तालुक्यातील एकूण १०११ गावांची कामे प्रगतीपथावर आहेत. पाणीपुरवठा योजना राबविण्याकरिता वाप्कॉस कन्सल्टन्सी लिमिटेड मुंबई व नाबार्ड कन्सल्टन्सी सर्विसेस यांची प्रकल्प सल्लागार म्हणून शासनातर्फे आक्टोंबर २०२१ मध्ये नियुक्ती केली आहे.
सर्व योजनांच्या कामांची अंमलबजावणी ही शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार योग्य व विहित वेळेत पूर्ण करण्याकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती. मीनल करणवाल, कार्यकारी अभियंता श्री. अमोल पाटील प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास योजना जिल्हा परिषद नांदेड श्री तुबाकले यांचा जिल्हास्तरावरून पाठपुरावा सुरू आहे.
तसेच या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संबंधित क्षेत्रीय अभियंत्यांनी योजनांच्या सर्व तांत्रिक बाबीचे प्रशिक्षण देण्याकरिता वाप्कॉस व नाबार्ड कन्सल्टन्सी सर्विसेस तर्फे दिनांक २६ व २७ रोजी जिल्हा परिषद सभागृह कै. यशवंतराव चव्हाण सभागृह येथे कार्यशाळा व प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावर भेट देऊन क्षमता बांधणी प्रशिक्षण आयोजित केले होते
कार्यशाळेचे प्रशिक्षण वरिष्ठ तांत्रिक सल्लागार श्री. रवींद्र ठाकूर, प्रकल्प समन्वयक श्री.अरुण सिंह नांदेड चे प्रकल्प समन्वयक श्री.रवींद्र अकुलवार व श्री. बी.अल्कोंडावर यांच्यातर्फे देण्यात आले यावेळी आमचे प्रतिनिधी व ११० क्षेत्रीय अभियंते तसेच जिल्हा परिषदेचे शाखा अभियंता व कनिष्ठ अभियंता हे उपस्थित होते.

0 Comments