लोहा शहरामध्ये कुठेही छोट्या गल्लीमध्ये, सिमेंट रोडवर, मुख्ये रस्त्यात हात गाडी उभे केले जातात अनेकान जवळ एक सोडून अनेक गाडे आहेत
त्यामुळे आपल्या गाड्याचे काम झाले की असे गाडी वाले किंवा काही दुकानदार ते गाडे रस्त्यामध्ये गल्लीमध्ये लावून टाकतात अशा प्रकारे रोडवर गाडी लावल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना वाहनांना महिला वृद्धांना त्रास होतो अडचण निर्माण होते.
यामुळे अनेक वेळा ट्राफिक जाम होते काही कारण नसताना जाणून बुजून रस्त्यात असे गाडे बेवारसपणे लावून सोडून दिले जातात विशेष करून मोंढ्या कडे जाणाऱ्या गल्ल्यांमध्ये अशा प्रकारचे अनेक गाडी लावून रस्ता ब्लॉक करण्यात येतो.
सदरची बाब लोहा पोलिसांच्या लक्षात येताच होणारी ट्रॅफिक जाम आणि अडचण पाहून लोहा पोलिसांनी अशाप्रकारे रस्त्यात लागलेले आठ हातगाडे जप्त करून पोलीस स्टेशनला नेऊन लावले आहेत.
सदर हातगाड्याचे मालक मिळून आल्यास त्यांच्याकडून हात गाडी खरेदी बाबतचे कागदपत्र असल्यास कारवाई करून असे गाडे सोडण्यात येतील. कागदपत्रे नसल्यास गाडे जप्त करून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
हातगाडे व इतर असे कोणतेही साहित्य ज्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या सामान्य नागरिकांना त्रास होईल अशा पद्धतीचे कोणीही रोडवर न लावता आपल्या स्वतःच्या जागेत नेऊन लावावे असे लोहा पोलिसातर्फे या वेळी आव्हान करण्यात आले आहे.

0 Comments