Header Ads Widget

भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पदावर काम न करण्याचा निर्णय मा. शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर

         माधव पवार 
भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी मराठा समाजाला आरक्षण जो पर्यंत मिळणार नाही तो पर्यंत त्या पदावर काम करणार नाही असा रोखठोक निर्णय घेऊन मराठा समाजाच्या कार्यकर्त्यासोबत राहणार असल्याचे मत मा. शिवराज पाटील होटाळकर यांनी सांगितले आहे
मराठा समाजाच्या मागण्याकडे सरकार तात्काळ लक्ष द्यावे त्याच बरोबर या मराठा समाजाच्या भावना लक्षात घ्यावे मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा मनोज जरांगे गी पाटील यांच्या योगदानामुळे अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या आरक्षणाच्या दरम्यान मराठा समाजातील आरक्षणाच्या बाबतीत होत असलेली नाराजी होत आहे

भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी लक्षात घेऊन सदरचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येते

सत्ता येईल व जाईल परंतु मराठा समाजाला आरक्षण मिळणे अतिशय महत्त्वाचे असल्यामुळे राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणा बाबत तात्काळ तोडगा काढून सदरच्या मराठ्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे अशी भावना व्यक्त करीत मा.शिवराज पाटील होटाळाकर म्हणाले की सरकार जोपर्यंत निर्णय घेणार नाही तोपर्यंत मी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यां सोबत असणार आहे 

Post a Comment

0 Comments