Header Ads Widget

पोनि चिंचोलकर यांचा दारू विक्रेत्यांना पुन्हा दणका, लोहा पोलिसांचा दारूवर छापा ७२ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल जप्त.

         माधव पवार
लोहा पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांच्या टीमने लोहा शहरांमध्ये पुन्हा अवैध दारू वाहतूक करणाऱ्या वाहनावर छापेमारी केली. या छापेमारी मध्ये लोहा पोलिसांनी ७२ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदर कारवाही मध्ये लोहा पोलीस च्या टीमने अवैध दारू सह दारू वाहतूक करणारे एक वाहन ही केली जप्त. लोहा पोलीस स्टेशनला महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही दिवसाखाली ही लोहा पोलिसांनी पाच ठिकाणी अवैध दारू अड्यावर छापे मारन साडे तीन लाखाच्या वर मुद्देमाल जप्त केला होता तरमागील आठवड्यात अवैध जुगारावर छापेमारी करून हजारोचा मुद्देमाल जप्त करून गुन्हे दाखल केले होते.

 लोहा पोलीस स्टेशन तर्फे सतत दारू आणि जुगारावर कारवाया करून गुन्हे दाखल करणे चालू असल्यामुळे
 अवैध धंदेवाले अस्वस्थ झाले आहेत.

सदरची कारवाई पोनि चिंचोलीकर यांच्या आदेशाने पोलीस अंमलदार केंद्रे मेजर,लाडेकर,गुट्टे, खाडे,यांनी केली.

Post a Comment

0 Comments