लोहा शहरांत रस्त्यामध्ये अडथळा करणारे, सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर मास मटन विकणारे, रोडवर कचरा टाकून घाण करणारे, सार्वजनिक ठिकाणी असभ्यवर्तन करणारे, विना नंबर वाहन चालविणारे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे यांच्यावर विशेष कारवाई करण्यात आली.लोहा पोलिस यांनी शहरांमध्ये विशेष मोहीम राबवली
या मोहिमेमध्ये रोडवर दुकाने लावने, हात गाडी लावणे, दुकानाचे सामान लावणे, दुकानासमोर रोडवर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनास व्यक्तीस अडथळा होईल त्रास होईल अशा पद्धतीने कृत्य करताना मिळून आलेल्या एकूण 13 आरोपीवर भारतीय दंडविधान २८३ प्रमाणे १३ गुन्हे दाखल करण्यात आले
तर आपल्या दुकानातील सामान रोडवर अडचण होईल अशा पद्धतीने ठेवणाऱ्या एकूण सहा आरोपीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९४९ कलम १०२, ११७ प्रमाणे ६ केसेस खटले दाखल करण्यात आले आहेत
सार्वजनिक ठिकाणी रोडवर आपल्या दुकानाचा कचरा टाकून शहरात रोडवर घाण केल्याबद्दल महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९४९ कलम११५ ,११७ प्रमाणे एका जनावर कारवाई करण्यात आली.नगरपालिकेने ठरवून दिलेल्या जागेच्या व्यतिरिक्त इतरत्र कोणत्याही ठिकाणी मासाचे दुकान लावणे मटन मास हे उघड्यावर दिसेल अशा पद्धतीत विकणे ठरवून दिलेल्या जागेच्या व्यतिरिक्त विकणे याच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १०५,११७ प्रमाणे मोंढ्यातील तीन आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत
सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन केल्याबद्दल महाराष्ट्र पोलीस अधिनियम ११०,११२,११७ प्रमाणे ३ लोकांवर केसेस दाखल करण्यात आले. असल्याची पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी दिली आहे
विना नंबर शहरांमध्ये वाहने चालवणाऱ्या एकूण बारा गाड्या पोलिसांनी आज जप्त केल्या आणि पोलीस स्टेशनला लावल्या वाहतुकीचे नियम मोडणारे कागदपत्रे न बाळगणारे रोडवर अस्ताव्यस्त गाडी लावणारे यांच्यावर एकूण ८४ वाहन धारकावर कारवाई करून ५६ हजार ७०० रुपयांचा दंड करण्यात आला आहे
सामाजिक सार्वजनिक सुरक्षितता स्वच्छता अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे

0 Comments