Header Ads Widget

खबरदार उघड्यावर मटन मास विकाल पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांचा मटन विक्रेत्यांना इशारा ३ लोकांवर गुन्हे दाखल

        माधव पवार
लोहा पोलीस स्टेशन हद्दी मधील लोहा शहरां मध्ये मोंढा या भागामध्ये उघड्यावर दिसेल असे मास मटन कापून विकत असल्याचे निदर्शनास आल्यावर तीन आरोपीच्या विरोधात लोहा पोलिस ठाण्यात ३ गुन्हे जनावर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी नायगाव फास्ट न्यूजला दिली आहे 
नगरपालिकेने ठरवून दिलेल्या जागेच्या व्यतिरिक्त लोकांना त्रास होईल दिसेल अशा पद्धतीने उघड्यावर मास मटन कापणे धुणे विकणे रस्त्यावर रस्त्यावर त्या कोंबड्याचे पंख टाकणे अशा लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून लोहा पोलीस स्टेशन तर्फे अशा तीन वेगवेगळ्या आरोपीवर मोंढा दिनांक २२ ऑक्टोंबर २०२३ रोजी तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत

 सर्वांना दिसेल अशा पद्धतीने मास मटन लटकून ठेवणे कापणे आरोग्यास धोकादायक असल्याने सदरची कारवाई करण्यात येत असल्याचे ते पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी सांगितले असून खबरदार या पुढे उघडे ठेवून मास मटन विक्री केल्यास लोह पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा ही लोहा पोलिसांनी दिला आहे  


Post a Comment

0 Comments