नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील कुंटूर प्राथमिक आरोग्य केंद्राची नूतन इमारत अखेर या भागातील रुग्णाच्या सेवेत आली असून या सदरच्या दवाखान्यात रुग्णासाठी मोठ्या प्रमाणात विविध योजना व औषध पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी या रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी के एस सोनवणे यांच्या कडून माहिती मिळाली असून या दवाखान्यामध्ये कुटुंब नियोजनांच्या शस्त्रक्रियेला प्रारंभ करण्यात आलेला आहे
नायगाव तालुक्यातील कुंटूर प्राथमिक आरोग्य केंद्राची नूतन भव्य इमारत गेल्या कोरोना महामारीच्या काळापासून सदरच्या इमारतीचे बांधकाम करण्यात येत होते सदरच्या या भागातील रुग्णाला सेवा देण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय कुंटूर येथे रुग्णाला उपचार देण्यात आले होते सदरची इमारत ही अतिशय भव्य बांधण्यात आली असून आरोग्य विभागाच्या मार्फत दवाखान्यात रुग्णासाठी मोठ्या सुविधा पुरविल्या जाणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी सोनवणे यांनी दिली आहे
कुंटूर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नवीन इमारती मध्ये शस्त्रक्रिया चालू झाली अशी माहिती वैद्यकीय अधिकारी के एस सोनवणे व तालुका आरोग्य अधिकारी श्रीकांत पटवेकर यांनी दिली यापुढे दररोज सदरील दवाखान्यात ओपीडी व इतर सुविधा देण्यात येतील असे सांगितले आहे

0 Comments