Header Ads Widget

मागील काही महिन्यापूर्वीचा व्हिडिओ व बातमी टीव्ही चॅनलवर दाखवून पोलीस विभागासह जनतेची दिशाभूल

         माधव पवार
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या एका ठिकाणी अवैध धंदा चालत असल्याची माहिती कळताच ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल बहात्तर यांनी सदरच्या धंद्यावर धाड मारून अड्डा उध्वस्त केला असताना सुद्धा काही सोशल मीडियावर गेल्या मागील काही महिन्या पूर्वीचा व्हिडिओ व बातमी प्रकाशित करून पोलीस विभागासह जनतेची दिशाभूल करत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे 

तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे यांनी ठाण्याच्या अंतर्गत कोणत्या ही ठिकाणी अवैध धंदे चालू नये म्हणून वेळीच ॲक्शन घेत असतात तशाच पद्धतीने कुंटूर ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या एका अज्ञात ठिकाणी अवैध पणे पत्त्याचा डाव व इतर डाव खेळत असल्याची माहिती कळताच तात्काळ पोलिसांचे कर्तव्य काय असते या हेतूने सदरच्या अड्ड्यावर धाड मारून अड्डा उध्वस्त केला आहे 

कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत सध्याच्या परिस्थितीमध्ये कसल्याच प्रकारचा अवैध अड्डा व पत्त्याचा डाव खेळाला जात नसताना सुद्धा कोणत्या तरी एका टीव्ही चॅनलवर मागील काही महिन्या पूर्वीचा व्हिडिओ दाखवून कुंटूर पोलिसांची बदनामी करण्याचा प्रयत्न चालवत असल्यामुळे असा प्रकार सध्या तरी कुंटूर ठाण्याच्या हद्दीत दिसून येत नाही असे स्पष्ट चित्र दिसून येत आहे

सदर प्रकरणातला व्हिडिओ जुना आहे  यासंदर्भात आम्हाला माहिती प्राप्त झाल्यानंतर आम्ही रेड सुद्धा केलेली आहे दिवाळी मध्ये जाहिरातीसाठी  काही मीडियाच्या माध्यमातून आम्हास ५००० हाजर १० हजार २५ हजाराची जाहिरात द्यावीच लागेल असे आम्हास व्हाट्सअप वर पत्रकही प्राप्त झाले आहे

नाही दिला तर आम्ही असे काही करू असे धमकी वजा बोलतही आहेत  कोणीतरी हेतू पुरस्पर येणाऱ्या दिवाळीसाठी जाहिरातीच्या माध्यमातून आर्थिक लाभ व्हावा या हेतूनेच सदरची बातमी लावलेली आहे सध्या सदर ठिकाणी काहीही चालू नाही तरीसुद्धा एवढ्या चांगल्या न्यूज माध्यमाने ही न्यूज का लावली हे समजून येत नाही या पाठीमागचे एवढेच कारण आहे की सदरची न्यूज फक्त आणि फक्त पैसे घेऊन ? लावलेली आहे 

सदर ठिकाणी पत्त्याचा डाव बसतो या व्यतिरिक्त दुसरा व्हिडिओ दाखवावा व कार्यवाही  न झाल्यास आपल्या मार्फतीने काहीही फ्लॅश करावे हे चॅलेंज आहे .

Post a Comment

0 Comments