नांदेड जिल्ह्याच्या सुप्रसिद्ध व तीर्थक्षेत्र असलेल्या माहूरच्या गडावर दुर्गा महोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी महिला पोलीस अधिकाऱ्यांसह इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी गडावर येणाऱ्या यात्रे करूसाठी सदरच्या दुर्गा महोत्सवाच्या निमित्ताने माहूरगडावर महिला पोलीस अधिकाऱ्यांचा चांगलाचा बंदोबस्त लागला आहे
माहूरगडावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कसल्याच प्रकारची अडचण निर्माण होऊ नये म्हणून चौक बंदोबस्त लावण्यात आला असल्यामुळे महिला पोलीस निरीक्षक वसुंधराताई बोरगावकर देवदर्शनासाठी येणाऱ्या महिलांसाठी व पुरुष भक्तांची मोठी काळजी घेत असल्याची दिसून येत आहे आहे
महाराष्ट्र राज्याच्या शेतकऱ्यावर दुष्काळाचे संकट मोठे कोसळले असताना रेणुका मातेच्या दर्शनासाठी भाविक भक्तांची मोठया प्रमाणात माहूरगडावर गर्दी असल्याचे वास्तव चित्र दिसून येत असून या महोत्सवाच्या निमित्ताने दररोज संगीत मैफिली रंगत असल्यामुळे दुर्गा महोत्सला चांगलाच रंग व बाहर चढत असल्याचे माहूरगडावर दिसून येत असून या गडावर मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे
राज्यातील शेतकरी सोयाबीन कापणीत व महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थिती स्पष्ट पणाने जाणवते महाराष्ट्रातुन रेणुका मातेचे संगीत सेवेसाठी वेगवेगळे लोक आपली संगीत व गायन सेवा देण्यासाठी व कला सादर करण्यासाठी मोठी गर्दी करत आहेत
माहूर गड राज्यातच नव्हे तर देशात प्रसिद्ध असलेले ठिकाण व तीर्थक्षेत्र असल्यामुळे दर वर्षी या माहूरगडावर भाविकाची गर्दी तुफानी होत असते या वर्षी दुष्काळ जन्य परिस्थिती असताना सुद्धा दुष्काळातुन शेतकऱ्यांना सावरण्यासाठी रेणुका मातेला शेतकरी साकडे घालत असल्याचे वास्तव चित्र दिसून येत असून या गडावर महिला पोलीस निरीक्षक वसुंधराताई बोरगावकर यांनी चौक बंदोबस्त देत आहेत

0 Comments