राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून अख्खा मराठा समाज पेटून उठला जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्याच्या सराटी येथे जरांगे पाटील यांची तुफानी सभा आयोजित करण्यात आली सदरच्या सभेसाठी लाखोंच्या संख्येने मराठा समाजाचे बांधव त्या सभेला आवर्जून उपस्थित राहिले आहे
सदरची विराट सभा ही अतिशय शांत आणि पोलीस प्रशासनाला तकलीफ न होता घेण्यात आली परंतु सदरच्या सभेमुळे प्रशासनाला चांगलाच घाम फुटला होता असे चित्र दिसून आले आहे
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा समाज पेटून उठला राज्यातल्या राज्यकर्त्यांना ४० दिवसाचा अल्टिमेटम देण्यात आला या सदरच्या कालावधीमध्ये सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुदा सोडविने योग्य आहे
सदरच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कसल्याच प्रकारची चाल ढकल करू नये कारण मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा अनेक वर्षापासून प्रलंबित असल्यामुळे सरकारने जरांगे पाटील यांनी दिलेल्या मुदतीत सोडविण्यात यावा असे तमाम मराठा बांधवांचे म्हणणे आहे

0 Comments