Header Ads Widget

शाब्बास लोहा पोलीस : पोनि चिंचोलकर यांच्या पोलीस टीमने उत्तर प्रदेशातून केले ६५ हाजार रुपयाचे चोरीतील मोबाईल जप्त !!

        माधव पवार 
लोहा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील असलेल्या 
बालाजी मोबाईल शॉपी लोहा हे दुकान फोडुन चोरटयांनी चोरुन नेलेले मोबाईल पैकी एकुण ३ मोबाईल  त्यांची अंदाजे किंमत एकूण ६५रुपये किंमतीचे मोबाईल उत्तर प्रदेशातून लोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांच्या पोलीस टीमने हस्तगत केल्यामुळे शाब्बास लोहा पोलीस अशी चर्चा जोरदार चालू आहे 
शहरातील दिनांक ५ एप्रिल २०२२ रोजी हनमंत बळवंत लांडगे यांचे लोहा शहरातील बालाजी मोबाईल शॉपी तसेच तुळशीराम रंगनाथ जोरुळे यांची साई मोबाईल गॅलरी तसेच आझीज गुलाम हुसैन कुरेशी यांची अनुपकुमार मोबाईल शॉपी ईत्यादी दुकाने चोरटयांनी पहाटे ४ ते ५ वाजण्याच्या दरम्यान शटर उचाकाडुन तिन अनोळखी चोरांनी मोबाईल व १० ब्लुटुथ व ७५ हाजार नगदी असा एकुण १०लाख ३ हाजार ११७ रुपयाचा मुद्देमाल चोरांनी चोरुन नेला होतासदर गुन्हयातील निष्पन्न दोन आरोपी व मोबाईलचे शोध कामी लोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षण चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस टीमने उत्तर प्रदेश राज्यातील किठोर तालूका मवाना जिल्हा मेरठ या ठिकाणी तसेच मसुरी जिल्हा गाजियाबाद येथे जाऊन तांत्रीक विश्लेषनाचे आधारे आरोपीचे पत्यावर शोध घेतला असता नमुद गुन्हयातील ३ विवो कंपनीचे एकुण ६५ हाजार किंमतीचे मोबाईल एका आरोपीच्या घरातुन घरझडती दरम्यान हस्तगत करण्यात आले आहे

यातील निष्पन्न आरोपीतांचा शोध पोलीसां मार्फत चालु असल्याचे पोनि चिंचोलकर यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले सदरची कामगीरी जिल्हाचे पोलीस अधिक्षक नांदेड श्रीकृष्ण कोकाटे यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे 

अप्पर पोलीस अधिक्षक नांदेड अविनाश कुमार उपविभागीय पोलीस अधिकारी कंधार मारोती थोरात पोलीस निरीक्षक पोस्टे लोहा ओमकांत चिंचोलकर यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि मंगेश नाईक,पोहेका नारायण कदम यांनी केली असून तांत्रीक माहीती पुरवणे कामी सायबर सेल नांदेडचे पोउपनि दळवी पोहेका राजेंद्र सिटीकर, पोहेका दिपक ओढणे यांनी मदत केली आहे 


 

Post a Comment

0 Comments