Header Ads Widget

लोहा पोलिसांचा रस्त्यात वाढलेल्या अतिक्रमणावर जेसीपीचा हातोडा पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांची दमदार कामगिरी

              माधव पवार
नांदेड जिल्ह्याच्या लोहा पोलीस ठाण्याच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या व रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या २० लोकांवर लोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून सदरची घेण्यात आलेली मोहीम ही महत्वपूर्ण असल्यामुळे एकीकडे कौतुक करण्यात येत आहे

दुसरीकडे रस्त्यावर अतिक्रमण काढण्यासाठी लोह पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांच्या बंदोबस्तात सदरचा जेसीपीचा हातोडा अतिक्रमणावर पडला आहे
जिल्ह्यातील लोहा पोलिस ठाण्याचे दबंग पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांचा रस्त्यात वाढलेल्या अतिक्रमणावर जेसीपीचा हातोडा मारला असून लोहा शहरातील रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात येत असल्याने रस्ते अगदी चकाचक होत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत असून सदरची मोहीम आती गतिमान केल्यास लोहा शहरात येणाऱ्या व जाणाऱ्या वहानासाठी योग्य ठरणार असल्याचे स्पष्ट चित्र सध्या तरी दिसून येत आहे

खबरदार : अतिक्रमण काढत असताना कोणी अडथळा निर्माण कराल तर पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांचा 
इशारा ----

खबरदार कोणी सदरच्या कारवाई दरम्यान दबाव टाकण्याचा अथवा अतिक्रमण काडीत असताना अडथळा निर्माण केला तर कायद्या नुसार लोहा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा पोनि चिंचोलकर यांनी दिला आहे 
लोह पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारल्या पासून अनेक अवैध धंदा बरोबर मटका जुगार अवैध देशी दारू शहरात मोटार सायकलीवर नाव काका मामा दादा असे टाकून मिरवणाऱ्या तसेच विना नंबरच्या मोटर सायकलवर मोटार वाहन कायद्या अंतर्गत मोहीम राबवून पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी दमदार कारवाई करण्याचा धूम धडाका उठविला आहे

नांदेड जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी यानी सुद्धा अशाच पद्धतीची अतिक्रमण हटाव हे महत्त्वपूर्ण मोहीम राबवून भल्या भल्याची झोप उडवली होती तशाच पद्धतीने लोहा पोलीस३ ठाण्याचे दमदार पोलीस अधिकारी ओमाकांत चिंचोलकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश पाळून पोलिसांचे कर्तव्य काय असते जनसामान्य माणसासह धन दांड्याला दाखवून देत असल्याने चांगल्याच धन दांडग्याची झोप उडाली आहे 





Post a Comment

0 Comments