Header Ads Widget

घुंगराळा गावच्या सरपंचाच्या अविश्वास प्रस्तावावर जिल्हाधिकाऱ्यांचा शिक्कामोर्तबवसंत सुगावे पाटील गटाला यश..! तर विरोधी गटाला चपराक

विशेष प्रतिनिधी : बाळासाहेब पांडे :

नायगाव तालुक्यातील घुंगराळा गावच्या सरपंच श्रीमती राधाबाई जोगेवार यांच्या विरुद्ध उपसरपंच वसंत सुगावे यांच्या नेत्रत्वाखाली इतर सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल करून  तो रीतसर पणे मंजूर झाला होता..नियमाप्रमाणेच नायगाव च्या तहसीलदार  मंजुषा भगत ह्यांनी अविश्वास प्रस्ताव मंजूर करून पारित केल्यामुळे सरपंचाला पदावरून पायउतार करण्यात आले होते. 

निलंबन केले.नंतर.ही  सरपंच पुत्राने या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केली होती. परंतु अविश्वास प्रस्ताव हा योग्य रीतीने व ९ सदस्या पैकी २ विरुद्ध ७ असा पारित करण्यात आला व तो निवडणूक अधिकाऱ्यांच्या समक्ष पार पाडल्याने, या याचिकेत कुठलेही तथ्य नसल्याने अविश्वास प्रस्तावास आव्हान देणारी जोगेवार यांची याचिका मा. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी  फेटाळून लावली.वादी जोगेवार यांच्या कडून ऍड उमेश मेगदे यांनी तर वसंत सुगावे व अन्य सहा प्रतिवादी तर्फे ऍड प्रदीप पाटील यांनी काम पाहिले.

घुंगराळा गावात विकास कामात अडथळा आणणार्यांना चपराक
       वसंत सुगावे
    या निर्णयाने घुंगराळा गावात विकास कामांना गती मिळणार असून केवळ आणि केवळ विकास कामात अडथळे आणण्यासाठी सूडबुद्धीने इतरांच्या इशाऱ्यावर जिल्हाधिकारी यांच्या कडे धाव घेणाऱ्या माजी सरपंच जोगेवार प्रतिनिधी पुत्र याना
चपराक भेटला असून भविष्यात विकास कामे न होऊ देण्या साठी हे प्रयत्न आहेत अशी प्रतिक्रिया आमच्या प्रतिनिधींशी बोलताना उप सरपंच वसंत सुगावे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments