Header Ads Widget

कोलंबी ग्रा.प.च्या सरपंच पदी सौ संजना लांडगेतर उपसरपंच पदी फेरोज शेख यांची बिनविरोध निवड

      बाळासाहेब पांडे
ग्रामपंचायत कार्यालय कोलंबी च्या सरपंच पदी संजना शिवाजी लांडगे तर उपसरपंच पदी फेरोज बंदगीसाब शेख यांची  बिनविरोध निवड करण्यात आली आहे* दि.17/10/2023 रोजी ग्रामपंचायत कार्यालय कोलंबी येथे सरपंच पदाची बिनविरोध निवड प्रक्रिया पार पडली.
     
पॅनल प्रमुख प्रवीण बियाणी यांच्या आदेशानुसार माजी सरपंच श्रीमती बैस यांनी अडीच वर्षे कालावधी संपल्या नंतर राजीनामा दिला होता.रिक्त झालेल्या जागेवर एकमेव अर्ज आल्याने   सरपंच पदी श्रीमती संजना शिवाजी लांडगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली व उपसरपंच पदी फिरोज बंदगीसाब शेख यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
    
या वेळी सभागृहात ग्रा.प. सदस्य संगीता अशोक सोनमनकर, अनिता तुळशीदास बैस, शेषीकलाबाई गोविंदराव बैस, नागरबाई शिवाजी शिंदे, देऊबाई ज्ञानोबा गवाले, धोंडुबाई जयवंत बर्लेवाड, यदवत्ता साहेबराव मुधळे,भगवान केरबा लांडगे, नब्बीसाब चांदसाब शेख आदी यावेळी उपस्थित होते 

ग्रामविकास अधिकारी एस. जे.  बोंडले, निवडणूक विभागाचे जोंधळे , तलाठी काळे  व कदम साहेब, पॅनल प्रमुख प्रवीणजी बालाप्रसाद बियाणी, तसेच मनोहर बुरपल्ले प, रायस्कर , माजी सरपंच शिवदत्त पोतलवाड, माजी तंटामुक्ती अध्यक्ष लक्ष्मण पाटील जाधव, माजी उपसरपंच मधुकर पाटील शिंदे तसेच नायगाव पोलीस कर्मचारी व गावकरी मंडळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments