विदर्भ मराठवाड्याला जोडणाऱ्या हिमायतनगर ते पळसपुर मार्गे डोलारी पेनगंगा नदी गांजेगाव उमरखेड जाणारा जिल्हा सीमा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून दुर्लक्षित असल्यामुळे येथील नागरिकांनी वारंवार लोकप्रतिनिधी कडे तसेच विद्यमान हादगाव हिमायतनगर विधानसभेचे आमदार माधवराव पाटील जळगावकर यांच्याकडे व हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत भाऊ पाटील यांच्याकडे सुद्धा या रस्त्याच्या मागणीची निवेदन देण्यात आले होते
गत या रस्त्यावर कोणत्याही लोकप्रतिनिधी लक्ष न दिल्यामुळे या रस्त्यावरून चार बाजारपेठ असल्याने आणि एक हिमायतनगर येथे रेल्वे स्टेशन असल्याने विदर्भ मराठवाडा जोडणारा राज्य जिल्हा सीमा रस्ता डोल्हारी ते पैनगंगा नदी पुलापर्यन्त असून या रस्त्याकडे बांधकाम विभाग सुद्धा दुर्लक्ष का करीत असेल बरं हे एक कोड आहे
हा रस्ता येतो हा जिल्हा परिषद मतदार संघ कामारी या मतदारसंघातील सदस्य तर आत्तापर्यंत एक वेळेस सुद्धा या रस्त्यावर फिरून बघले नसल्याचे या भागातील नागरिकांचे म्हणणे आहे तर याबाबत या रस्त्याच्यासाठी सार्वजनिक बांधकाम उपविभाग हिमायतनगर यांच्याशी सुद्धा फोनवरून संपर्क साधला असता हा रस्ता आमच्याकडे येत नाही आणि त्या रस्त्यावर काही करू शकत नाही असे त्या ठिकाणचे अभियंत्यांनी प्रस्तुत नायगाव फर्स्ट न्यूज च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे
हा रस्ता आज दिनांक १६ रोजी पळसपुर येथील जेष्ठ पत्रकार सामाजिक कार्यकर्ते तथा चेअरमन चांदराव वानखेडे पळसपुर यांच्यासोबत विदर्भ येथील ढानकी चे प्रवासी महामंडळाचे तालुका अध्यक्ष शेख इरफान व त्यांचे सहकारी चव्हाण यांच्या सोबत नायगाव फास्ट न्यूजचे हिमायतनगर तालुका प्रतिनिधी नागोराव शिंदे पळसुरकर यांनी जीवाचं रान केले आहे
त्या ठिकाणी स्वखर्चातून नागरिकांच्या लोकवाट्यातून त्या ठिकाणी जेसीबी लावून त्या ठिकाणी उमरखेड आगाराच्या व आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशातील म्हैसा आगाराच्या एसटी बस काही दिवसातच सुरू करण्याचा खटाटोप त्या ठिकाणी चालवण्याचे या चित्रावरून स्पष्ट दिसत आहे तर याकडे या भागातील लोकप्रतिनिधी सह बांधकाम विभाग लक्ष देईल का असा प्रवाशातून सवाल होत आहे

0 Comments