Header Ads Widget

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात २४ तासाच्या कार्यकाळात २४ जणांचा मृत्यू तर आरोग्य मंत्री झोपा काढताहेत का ? धक्कादायक घटनेने जिल्हा हादरला

        माधव पवार
नांदेड : नायागांव नांदेड शहरातील शासकीय रुग्णालयात २४ तासात २४ जणांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे यात १२ नवजात बालकांचा समावेश असून आरोग्य मंत्री जिल्हाचे पालक मंत्री नेमके करताहेत तरी काय ? असा ग्रामीण भागातील जनतेतून विचारला जात आहे.

शासकीय रुग्णालयात औषधांचा तुटवडा निर्माण झाला असल्यामुळे दवाखान्यात मृत्यू तांडव पसरले वेळेवर औषधांचा पुरवठा झाला नसल्याने रुग्णांना आपला जीव गमवावा लागला असल्याचा आरोप तमाम जनतेतून केला जात असून हाफकीनने औषधी खरेदी बंद केल्यामुळे राज्यभरातील शासकीय रुग्णालयात औषधांचा प्रचंड तुटवडा जाणवत असताना आरोग्य मंत्री झोपी काढत होते का असा प्रश्न विचारला जात आहे.

याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाने प्रतिक्रिया दिली असून, या प्रकरणी शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी मृतांमध्ये बाहेरच्या रुग्णाचा जास्तीचा समावेश होता असा दावा केला आहे. या घटनेमुळे नांदेडमध्ये एकच खळबळ उडाली असून, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे

दरम्यान नांदेड येथील घडलेल्या घटनेच्या संदर्भात चौकशी समिती नेमली जाणार असल्याची माहिती वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. सोबतच आपण स्वतः रुग्णालयात जाऊन पाहणी करणार असल्याचे देखील मुश्रीफ म्हणाले. तसेच, “हे सर्व प्रकरण नेमकं काय आहे हे चौकशी केल्याशिवाय समजणार नाही. आमचे आयुक्त तत्काळ आजच तिकडे निघणार आहेत. तसेच मी देखील उद्या जाऊन सर्व घटनेचा आढावा घेणार असल्याचे,” मुश्रीफ म्हणाले.


Post a Comment

0 Comments