Header Ads Widget

भूकंप झाल्याच्या चर्चेने नायगावच तहसील प्रशासन तीन गावात दाखल - तहसीलदारानी साधला जनतेशी संवाद !!

         माधव पवार 
नायगाव तालुक्यातील शेळगाव गौरी धूप्पा येथे दिनांक २ ऑक्टोंबर २०२३ रोजी सकाळी अचानक भूगर्भातून आवाज आल्याचा भास व भूकंप झाल्याची चर्चा व शंका वाढली असल्यामुळे तालुक्यासह जिल्ह्यात व खेड्यापाड्यात एकच खळबळ उडून नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते
परंतु या भूकंपाची हवामान खात्याकडे कसल्याच प्रकारचची नोंद नसल्यामुळे कोणी ही विश्वास ठेवू नये असे नायगावच्या कर्तव्यदक्ष महिला तहसीलदार मंजुषा भगत यांनी या भागातील नागरिकांना आवाहन केले होते

तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या शेळगाव गौरी धूप्पा टाकळी बु. येथे नायगावच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार मंजुषा भगत यांनी गावाला भेटी देऊन सदरील गावातील नागरिकां सोबत घेऊन अतिशय महत्त्वाच्या भूकंपाच्या संदर्भात नागरीकाशी संवाद साधला आहे
प्रशासनाचे कर्तव्य काय असते आणि भूकंप झाल्यास काय करावे यावर तहसीलदाराने सखोल सदरच्या नागरिकांना मार्गदर्शन केले आहे 

भूकंपाच्या बाबतीत शेळगाव गौरी  धूप्पा टाकळी बु येथे ग्रामस्थांची भेट घेतली आणि भूकंप झाल्या नंतर करावयाच्या उपाय योजना बाबत माहिती सांगण्यात आली असून या भागातील कोणत्या ही नागरिकांनी  विश्वास न ठेवता समाधान राहावे असे तहसीलदार म्हणाल्या आहेत 

व प्रशासन आपल्या सोबत असल्यामुळे कसल्याच प्रकारची चिंता करण्याची आवश्यकता नाही असे ही यावेळी तहसीलदार मंजुषा भगत यांनी सवांद साधताना सांगितले आहे

Post a Comment

0 Comments