माधव पवार
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर जवळ काहाळा बु येथील मदरसा शाळेच्या जवळ पास एका अनोळखी व्यक्तीला एका आज्ञात वहानाने जब्बर धडक दिल्यामुळे गंभीर झाला होतात्यांना कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि विशाल बहातरे यांच्या मार्गदर्शनाखाली बरबडा बिटचे ए एस आय नागोराव पोले यांच्यासह पोलीसानी डायल १०८ ला संपर्क करून सदरच्या अनोळखी व्यक्तीला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते
परंतु त्या व्यक्तीचा उपचारा दरम्यान मृत्यू पावला असल्याची माहिती ए एस आय नागोराव पोले यांनी दिली आहे
तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना ही दिनांक १४ ऑक्टोबर २०२३ रोजी ८ वाजता नायगाव ते नांदेड जाणाऱ्या रोडच्या बाजूला कहाळा बु शेत शिवार मदरसा शाळेजवळ घडली सदरील अनोळखी पुरुषाला कोणत्या तरी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो जखमी झाला होता त्याना सरकारी दवाखाना विष्णुपुरी नांदेड येथे अंबुलन्स १०८ मध्ये नेवून दाखल केले आहे
कुंटूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात घडलेल्या घटनेतील अनोळखी व्यक्तीचा दिनांक १६ ऑक्टोबर २०२३ रोजी ३ वाजताच्या सुमारास नांदेड येथील शासकीय रुग्णालय वार्ड क्रमांक ५० मध्ये मरण पावला आहे
सदर अनोळखी इसमाचे प्रेत सरकारी दवाखाना विष्णुपुरी नांदेड येथे पीएम करून ओळख पटविण्यासाठी शेवग्राहात ठेवण्यात आले असून कोणाच्या जवळचा व ओळखीचा असल्यास कुंटूर पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना मोबाईल नंबर ९६५७७१८२३२ / ९७६३०९७२२२ यावर संपर्क करावा असे आवाहन केले असून त्याच्या उजव्या हातावर ओम साई मसनेर असे गोंदलेले आहे

0 Comments