नांदेड जिल्हाच्या नायगाव बाजार येथील तिरंगा दुर्गा महोत्सव समितीच्या वतीने दरवर्षी वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाने व कार्यक्रमाने सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते या दुर्गा महोत्सवाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यात रक्त दात्यानी रक्तदान करून एक शुभ संदेश दिला आहे
नायगाव येथे दिनांक २१ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजण्याच्या दरम्यान गोवळकर गुरुजी रक्त पेढी नांदेडच्या मदतीने तिरंगा दुर्गा महोत्सव समिती कडून राजुरा मारुती मंदिर येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले या शिबिरात शहरातील अनेक रक्तदात्यांनी रक्त दान करून प्रचंड प्रतिसाद दिला आहे शहारातील तिरंगा दुर्गा महोत्सव समितीचे अध्यक्ष माधव शंकरराव पाटील कल्याण यांच्या पुढाकाराने रक्तदान शिबिराचे दरवर्षी आयोजन करण्यात येत असते या रक्तदान शिबिरात युवक ही मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवित असतात या सदरच्या विशेष कार्यक्रमाला विशेष मान्य वरांची उपस्थिती लाभली आहे
भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय पाटील ढगे
विधानसभा प्रमुख विठ्ठल पाटील चोळाखेकर मा नगरसेवक देविदास पाटील बोमनाळे विनोद सावकार गंजेवार बाबासाहेब हंबर्डे पञकार गजानन चौधरी पत्रकार प्रभाकर लकपत्रेवार ,गंगाधर पाटील कल्याण, माधव पाटील चव्हाण , साहेबराव पाटील कल्याण साईनाथ सांगवीकर, संजय पाटील कल्याण अवकाश पा.धुपेकर आदी यावेळी उपस्थित होते
राजेश पा.कल्याण,राजु आप्पा बेळगे,पंडित पा.कल्याण,शेशेराव देगावे,माधव आनेराये,दत्ता यसके, शिवराज नागठाणे,दत्ता पा.नारे,देविदास पांचाळ,सुरज कदम,साईनाथ नरवाडे, गिरी कल्याण,शुभम नरवाडे, सोमनाथ महाराज,गोपाळ आवळे, प्रथम सालेगाये, ओमकार पांचाळ,उपस्थित होते.

0 Comments