Header Ads Widget

रवींद्र तहकीक यांच्या अटकेचा व्हाॅईस आॅफ मीडिया नायगाव तालुका पत्रकार संघाच्यावतीने निषेध तहसीलदारांना निवेदन


नायगाव : बाळासाहेब पांडे

छत्रपती संभाजी नगर येथील दैनिक लोकपत्र चे कार्यकारी संपादक रवींद्र तहकीक यांना अटक करून लोकशाहीची मुस्कटदाबी केलेल्या घटनेच्या निषेधार्थ व्हाईस आॅफ मीडिया नायगाव तालुका पत्रकार संघटनेचे वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले,

रवींद्र तहकीक यांनी शासनाच्या विरोधात सडेतोड भूमिका घेऊन लेखन केल्याबद्दल त्यांना जाणीवपूर्वक अटक करून लोकशाही स्वातंत्र्याची गळचेपी करत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा प्रयत्न केला जात आहे .त्यामुळे लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या वृत्तपत्र प्रतिनिधी यांना स्पष्ट आणि निर्भीडपणे लिखाण करणाऱ्या वर काही मर्यादा येत आहेत त्यांच्यावर प्रतिबंध लावण्याच्या उद्देशाने अटक करण्यात आली आहे 

यापूर्वी देखील लोकशाही वृत्तवाहिनी काही तासासाठी बंद करण्यात आली होती अशा वारंवार होणाऱ्या घटनांमुळे लोकशाहीवर घाला घातला जात आहे.या घटनेचा व्हाईस आॅफ मीडिया पत्रकार संघटनेचे  वतीने निषेध व्यक्त करण्यात आला असून याबाबत व्हाईस आॅफ मीडिया पत्रकार संघटनेचे संघटनेचे वतीने निषेधाचे लेखी निवेदन नायब तहसीलदार
देवराय यांना देण्यात आले. 

यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब पांडे ,ता.अध्यक्ष नागेश पाटील कल्याण ,बालाजी नागठाणे, माधव मामा कुकरले ,नागेराव पा बंडे, संदिप कांबळे ,पवन कुमार पुठेवाड, जेठेवाड, शिवाजी कुंटुरकर,मनोज झुंजारे,  यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments