Header Ads Widget

राष्ट्रीय महामार्ग ३६१ नंबरच्या कामाचे लोखंडी रॉड व इतर साहित्य चोरणाऱ्या आरोपीला पोलीस निरीक्षक चिंचोलकरानी केले जेरबंद

          माधव पवार
नांदेड जिल्ह्याच्या लोहा पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी ठाण्याचा पदभार स्वीकारल्या पासून दमदार कामगिरी बजावत असल्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील कामाचे साहित्य चोरून नेणाऱ्या आरोपी सह त्यांच्याकडील चोरून नेलेले साहित्य हस्तगत करून आरोपीला अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी दिली आहे 

जिल्ह्यातील लोहा पोलीस ठाण्याचे दमदार पोलीस अधिकारी म्हणून जिल्ह्यात परिचयात असलेले पोलीस निरीक्षण चिंचोलकर यांनी राष्ट्रीय महामार्ग ३६१ च्या कामाचे लोखंडी रॉड,गॅस टाकी व इतर साहित्य चोरी करणाऱ्या चोरास पकडून त्याच्या कडून मुद्देमाल लोहा पोलिसांनी केला जप्त पोलीस स्टेशन लोहा येथे ३ लाख ७८ हजार ३४ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे

लोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षण ओमाकांत चिंचोलकर यांनी लोहा पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान गुन्ह्यातील चोरी गेलेला ६५ रॉड पोलिसांनी जप्त केले असून एक गॅस टाकी जप्त केली आहे इतर आरोपींचा शोध चालू आहे सदर आरोपीस आज न्यायालयात सादर केले असून त्याला एक दिवसाचा पीसीआर मिळाला आहे

Post a Comment

0 Comments