Header Ads Widget

आमदार राजेश पवार यांच्या निधीतून डोंगरगाव ते हुस्सा रस्त्याच्या विकासासाठी एक कोटी ५२ लाखाचा निधी उपलब्ध बाबासाहेब हंबर्डे यांच्या प्रयत्नाला यश

         माधव पवार
नायगाव विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार राजेश पवार यांच्या निधीतून डोंगरगाव ते हुस्सा गावाच्या रस्त्यासाठी एक कोटी ५२ लाख रुपयाचा निधी उपलब्ध करण्यात असून भारतीय जनता पार्टीचे जिल्हा चिटणीस बाबासाहेब हंबर्डे यांच्या मागणीला प्रयत्नाला यश मिळाले आहे

सदरचा रस्ता हा गेल्या ३० वर्षापासून हुस्सा ते डोंगरगाव हा रस्ता प्रलंबित होता परंतु आमदार पवार  यांनी जिल्हा नियोजन समिती मधून एक कोटी ५२ लाख रुपयाचा निधी मंजूर केला आहे

नायगाव तालुक्यातील डोंगरगाव ते हुस्सा रस्त्याच्या कामाचे दिनांक ३० सप्टेंबर २०२३ रोजी भूमिपूजन सोहळा आपल्या नायगाव तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे नूतन तालुका अध्यक्ष दत्ता पाटील ढगे सावरखेडकर यांच्या शुभहस्ते पार पडला आहे

भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष माधव पाटील कल्याण गंगाधर पाटील नारे गोविंदराव पाटील जाधव माजी पंचायत समिती सदस्य लक्ष्मण पाटील सुजले गावकर कोठाळा नगरीचे सरपंच भगवान पाटील डांगे इकळी मोर येथील तिरुपती पाटील मोरे व साहेबराव पाटील मोरे तसेच सांगली येथील शंकर पाटील कदम मेळगाव येथील मारोतराव पाटील आदी उपस्थित होते

बरबडा येथील बालाजी पाटील व तसेच हुसा येथील सरपंच रमेश पाटील हंबर्डे व उपसरपंच प्रतिनिधी शिवाजी पाटील हंबर्डे चेअरमन रामदास पाटील हंबर्डे व साहेबराव पाटील देगावे आणि गावातील नागरिक खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

सदरचा भूमिपूजन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला तरी आमदार राजेश पवार यांचे समस्त गावकऱ्यांच्या वतीने त्यांनी दिलेल्या निधी बद्दल आभार व्यक्त करण्यात आले असल्याची माहिती बाबासाहेब हंबर्डे यांनी दिली आहे 


Post a Comment

0 Comments