Header Ads Widget

माजी सरपंच व उपसरपंच यांच्यासह ग्रामपंचायत सदस्याचे रखडलेले मानधन पं.स. स्तरावर गट विकास अधिकाऱ्यानी तात्काळ बँक खात्यात जमा करावे

                माधव पवार 
नांदेड जिल्ह्यासहा ग्रामीण भागातील गेल्या चार ते पाच वर्षाखालचे गावचे कारभारी म्हणून गाव सांभाळणारे माजी सरपंच व माजी उपसरपंच ग्रामपंचायत कार्यालयाचे सदस्य या सर्वांचे महिनेवारी मिळणारे तुटपुंजे मानधन शासनाने अद्याप त्यांच्या बँक खात्यात जमा केले नसल्यामुळे ते तात्काळ जमा करावे अशी मागणी केली जात आहे

सदरच्या माजी सरपंच व माजी उपसरपंच त्याच बरोबर ग्रामपंचायत कार्याचे सदस्य यांच्या बँक खात्यात बँकेचे खाते क्रमांक घेऊन सुद्धा जमा केले नाही ते तात्काळ जमा करावेत अशा पद्धतीची मागणी तमाम गावातील माजी सरपंचानी केले आहे

जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यासह ग्रामीण भागातील तत्काळलीन माजी सरपंच व उपसरपंच व सर्व ग्रामपंचायतचे सदस्य यांचे एकूण तीन वर्षाचे मानधन रखडले असल्यामुळे प्रशासनाच्या वतीने सदर सदस्याचे बँक खाते व आधार कार्डाचा नंबर प्रशासनाकडे देण्यात आला आहे 

ग्रामसेवकानी पंचायत समितीकडे गेल्या तीन ते चार महिन्याखाली देऊन सुद्धा अद्याप त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले नसल्यामुळे ते मानधन तात्काळ जमा करावे अशी मागणी केली जात आहे 


Post a Comment

0 Comments