बिलोली दारूबंदी अधिकारी यांच्या हप्ते खोरी मुळे नायगाव तालुक्यातील व ग्रामीण भागातील खेड्यापाड्यात अनेक अवैध देशी दारूचे दुकाने थाटली गेली असल्यामुळे २४ तास गावातच दारू मिळत असल्याने नवतरुण वर्गाची ही संख्या देशी दारूच्या आहारी गेल्याचे स्पष्ट चित्र खेड्यापाड्यात दिसत आहे
बिलोलीचे दारूबंदी अधिकारी हे नावालाच उरले असून हप्त्याच्या लालशेपोटी ग्रामीण भागाच्या खेड्यापाड्यात खुलेआम विनापरवाना देशी दारूचे अड्डे नांदेड ते हैद्राबाद राज्य मार्गा वरील धाब्यावर असो छोटू खेड्यात असो गावात दोन ते तीन दुकानाच्या वर अवैध विना परवानगी सर्रास देशी दारू विकली जात आहे
खेड्यापाड्यातील देशी दारू बंद करण्यासाठी गावातील अनेकांनी बंद करण्याचा प्रयत्न केला परंतु दारू बंदी अधिकाऱ्याच्या झोपेच्या सोंगामुळे खेड्यापाड्यात दारूचे सोंग झाले आहे
गावा गावांत काय करता देशी दारू बंद होत नसल्याने सदरची देशी दारू विकणाऱ्या दारू दुकानाला बिलोलीच्या दारूबंदी अधिकाऱ्याचे चांगलेच सहकार्य असल्याने आम्ही हप्ते देतो फुकट विकत नाही असे विना परवाना देशी दारू विक्री करणाऱ्या दुकान दारातून बोलल्या जात आहे

0 Comments