माधव पवार
महाराष्ट्र शासन दरवर्षी स्वच्छता मोहीम हाती घेत असली तरी या सदरच्या स्वच्छता मोहिमेतून रस्त्यावर पडलेला केर कचरा बाजूला काढून टाकणे रस्त्याची साफसफाई करून झाडने म्हणजे गाव स्वच्छ झाले असे प्रशासनाला वाटत असले तरी ग्रामीण भागात सध्याच्या परिस्थितीमध्ये प्रत्येक गावात घाणच घाण माजली असल्याने ती सदरची घाण शासन व ग्रामपंचायत कार्यालय कधी साफ करणार असा प्रश्न चर्चेला जात आहे
नांदेड जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह नायगाव तालुक्यात आणि खेड्या पाड्यांमध्ये अनेक ग्रामपंचायत कार्यालयाच्या बेजबाबदारपणामुळे रस्त्यावर पाणी रस्त्यावर शौचालयात बसणे रस्त्यावरच केर कचरा टाकने नाल्या नं साफ करणे रस्त्यावर जाताना येताना दुर्गंधी येणे ही स्वच्छता मोहिमेसाठी कितपत योग्य ठरणार असा प्रश्न चर्चेला जात असला तरी सदरच्या मोहिमेतून गावची प्रगती होणार का ? असा प्रश्न जनसामान्य माणसाला भेडसावत आहे
महाराष्ट्र शासनाने शासन आपल्या दारी ही मोहीम अमलात आणली असली तरी सदरच्या मोहिमेचा फज्जा ग्रामीण भागात चांगलाच उडाला असून या मोहिमेला खेड्यापाड्यात कसल्याच प्रकारचे महत्त्व उरले नाही शासन आपल्या दारी येऊ शकत नाही परंतु नागरिक शासनाच्या दारी गेल्याच्या नंतर सुद्धा प्रशासनातील अधिकारी बोलण्यास तयार नसल्याचे अनेकातून सांगण्यात येते आहे
प्रत्येक खेड्यातील घाण संपल्या शिवाय गाव स्वच्छ दिसत नाही आणि गावचा विकास ही होत नसल्याचे ही सुज्ञान नागरिकांतून बोलल्या जात आहे

0 Comments