Header Ads Widget

आमदार बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते नांदेड येथे तर बरबड्यात गावकऱ्याच्या वतीने चंद्रपूरचे जिल्हा संपर्क प्रमुख गंगाधर बडूरे यांचे जंगी स्वागत !!

         माधव पवार 
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील बरबडा येथील रहिवासी असलेले शिवसेना पक्षाच्या माध्यमातून अनेक वेळा जिल्हा परिषद बरबडा गटाची निवडणूक लढविलेले व शिवसेनेचे गंगाधर बडुरे यांचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते नांदेड येथे तर बरबडा नगरीच्या वतीने चंद्रपूर जिल्हाचे जिल्हा संपर्क प्रमुख बडूरे यांचे जंगी स्वागत करण्यात आले आहे
लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीच्या जवळ जवळ येत असल्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या वतीने बरबड्याचे विद्यमान गंगाधर बडूरे यांच्या शिवसेने मोठी जबाबदारी दिली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आदेश आणि आपल्या गटातील व पक्षातील कार्यकर्त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत व अभिनंदन करण्यात येत आहे

नायगाव तालुक्यातील बरबडा येथील गंगाधर बडूरे यांची नांदेड जिल्हा सोडून चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून निवड केली असल्याने शिवसेने आमदार बालाजी कल्याणकर यांचे वतीने नांदेड येथे तर बरबडा येथे गावकऱ्याचे वतीने निवडी नंतर म्हणजे मुबंई येथून येताच फटक्याची अतिषबाजी करून टोले जंग स्वागत करण्यात आले आहे 

Post a Comment

0 Comments