Header Ads Widget

जय जय जय भवानी म्हणत विरसणी येथे बैला विना चक्क ट्रॅक्टरचा ७५ वर्षाच्या काळातील पहिला पोळा

हिमायतनगर  नागोराव शिंदे 

तालुक्यातील मौजे विरसणी येथील सर्व ट्रॅक्टर वाल्याने चक्क ट्रॅक्टरचा पोळा काढला दर वर्षी बैलांचा सण असल्यामुळे बैल पोळा काढत होते परंतु या वर्षी लंपी आजारामुळे बैल पोळा कुठेही साजरा करण्यात आला नाही म्हणून विरसणी येथील सर्व ट्रॅक्टर मालकाने गावात आगळावेगळा पोळा हा सण कार्यक्रम केला आहे
गावाने ट्रॅक्टर फिरवले सर्व गावातील देव देवतांना  ट्रॅक्टर नेऊन दर्शन  सर्वांना दाखुन दिले हा पोळा भारतीय स्वतंत्र्याच्या काळापासून प्रथमच या गावात बैला विना ट्रॅक्टरच्या सहाय्याने साजरा करण्यात आला आहे 

हा पोळा बघण्यासाठी सर्व गावकरी मंडळी यांची पाहण्यासाठी गर्दी झाली होती


आगळावेगळा कार्यक्रम नांदेड जिल्ह्यात पहिली बार पाहण्यासाठी मिळाला आहे तरी या विरसणी गावांमध्ये सर्व धर्मांतील लोक ऐका जागी येऊन पोळा हा सण साजरा करतात आणि आसे आनेक सन एकजुटीने मोठ्या थाटामाटात साजरा करतात सर्व एकत्र येतात आणि या वर्षी मात्र शासनाने आदेश दिले आहेत

लंपी आजारामुळे बैल पोळा साजरा करण्यात येऊ नये म्हणून सर्व जनतेने शासनाच्या आदेशानुसार पालन करुन पोळा हा सन साजरा करण्यात आला आहे

Post a Comment

0 Comments