नांदेड जिल्ह्याच्या लोहा पोलिस ठाण्याच्या वतीने पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या जेष्ठ मंडळीच्या उपस्थिती मध्ये ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी सदरची शांतता कमिटीची बैठक आयोजित केली होती
या शांतता कमिटीच्या बैठकी दरम्यान जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते ज्येष्ठ मंडळीचा यावेळी सत्कार करण्यात आला आहे
जिल्ह्यातील लोहा पोलिस ठाण्याचा नुकताच पदभार स्वीकारलेले कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांची ठाण्याच्या अंतर्गत कोतकास्पद कामगिरी होत असल्याने या भागातील व शहरातील जनता पोलिसांच्या लोहा पोलिसांच्या कार्यप्रणालीवर समाधान व्यक्त करीत आहेत
लोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी दिनांक १४ सप्टेंबर २०२३ रोजी ठाण्या मध्ये शांतता कमिटीची बैठक बोलावली होती या बैठकी दरम्यान सर्व गावातील पोलीस पाटील सरपंच उपसरपंच महात्मा गांधी तंटामुक्तीचे अध्यक्ष व शहरातील जेष्ठ मंडळी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
पोलीस अधीक्षक कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली सदरची बैठक संपन्न झाली यावेळी पोळा गणपती ईद दुर्गादेवी काही दिवसात येणाऱ्या सणाच्या निमित्ताने सदरची मीटिंग बोलाविण्यात आली होती असे पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी सांगितले आहे
विशेष म्हणजे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते ९६ वर्षाच्या माजी पोलीस पाटलांचा तथा सध्याचे तंटामुक्तीचे अध्यक्ष या नामवंत नागरिकांचा ठाण्याच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला आहे

0 Comments