Header Ads Widget

कृष्णूर व घुंगराळा येथील २२० उपकेंद्रात झाडेच झाडे वाढली असल्यामुळे झाडीत वानराची वस्ती तर कर्मचाऱ्याना ही धोक्याची घंटा -

                  माधव पवार
नायगाव तालुक्यातील महापारेषन महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषन कंपनी मर्यादीत प्रतिबंधक कृष्णूर व घुंगराळा २२० केव्ही उपकेंद्रात झाडेच झाडे वाढली असल्यामुळे येथे वानरची मोठया संख्येने वस्ती बनली आहे

तर येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना धोक्याची घंटा सदरचे क्षेत्र बनले असल्यामुळे सदरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानी लक्ष देऊन झाडाची कतल करावी अशी मागणी भोवतालच्या शेतकऱ्यानी केली आहे

तालुक्यातील कृष्णूर व घुंगराळा येथील २२० केव्ही उपकेंद्रात मोठी स्पीड लाईट असते येथे झाडी वाढल्याने वानराची चांगलीच वस्ती वाढली असल्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्याचे सदरच्या जंगली प्राण्यामुळे शेतातील पीके नास धूस नुकसान करीत आहेत

वन विभागाच्या अधिकाऱ्यानी वानराचा बंदोबस्त करावा तर महापारेषन महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषन कंपनी मर्यादीत प्रतिबंधक अधिकाऱ्यानी झाडाची कतल करण्याची मागणी होत आहे

घुंगराळा येथील शेतकरी ज्ञानेश्वर शामराव मरवाळे व किशन नागोराव मरवाळे यांचा गट क्रमांक २७३ असून यांच्या शेतासह इतर शेतकऱ्याच्या शेतातील वानराच्या कळपामुळे मोठे नुकसान झाले असल्यामुळे येथील झाडाची कतल करून सदरचा परिसर साफ सफाई करण्यात यावी अशी मागणी ज्ञानेश्वर शामराव मरवाळे यांनी केली आहे 

Post a Comment

0 Comments