Header Ads Widget

बरबडा प्रार्थमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केला अवयवदान करण्याचा संकल्प - डॉ.पबितवार यांची माहिती

          माधव पवार
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील बरबडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.पबीतवार यांनी  स्वतःचे अवयदान करण्यासाठी ऑनलाइन फॉर्म भरला असल्याची माहिती दिली आहे
ते असे सांगितले की कुणाचा मेंदू मृत होतो अशावेळी त्यांच्या शरिरातील अवयव गरजूंना देणे याच्या शिवाय मोठे कार्य नाही मृत व्यक्तिच्या अंत्यसंस्कारानंतर शरिरातील चांगले अवयव नष्ट होतात त्यासाठी अवयवदान करणे म्हणजे महत्वाचे कार्य आहेअवयवदान करणाऱ्याच्या अवयव दानामुळे गरजू रुग्ण जर मरणाच्या दारातून परत येणार असेल व तो पुढे चांगले आयुष्य जगणार असेल तर अवयवदाना सारखे महान काम कुठे ही नसल्याचे नायगाव तालुक्यातील बरबडा प्राथमिक आरोग्य केंद्राची वैद्यकीय अधिकारी डॉ. पबीतवार यांनी सांगितले आहेभारतात अवयवदानाचे प्रमाण अतिशय कमी असल्यामुळे हे प्रमाण वाढण्याची गरज असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ पबीतवार यांनी पुढे असे सांगितले की ज्या रुग्णांना अवयवांची गरज असते त्यांना ते मिळत नसल्याने मृत्युचा सामना करावा लागतो त्यामुळे अवयवदाना बाबत सजगता प्रत्येकात येणे गरजेचे आहे

यासाठी जनजागृती महत्त्वाची असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ पबितवार यांनी सांगत ते पुढे म्हणले की अवयवदान चळवळीचे प्रणेते डॉ. भाऊसाहेब मोरे यांनी केले यांनी केले असल्याने अवयवदान करणे ही काळाची गरज असल्याचे तालुक्यातील बरबडा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पबीतवार यांनी यांनी सांगितले आहे 



Post a Comment

0 Comments