Header Ads Widget

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी राज्यातील पत्रकारांची जाहीर माफी मागावी प्रा. रवींद्र पाटील चव्हाण -

                 माधव पवार
विरोधी आवाज हे लोकशाहीचे मुलभूत सौंदर्य आहे परंतु भाजपाला हे मान्य नाही‌ लोकशाहीत वर्तमानपत्रे ही विरोधी पक्षाचे काम करतात राज्य कर्त्यांवर अंकुश ठेवण्याचं काम करणे हे त्यांचे काम असते परंतु हे हे भाजपाच्या नेत्याना जमत नाही असे प्रा. रवींद्र पाटील चव्हाण म्हणाले आहे

आवाज दाबण्याचे धडे खुद्द भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आपल्या कार्यकर्त्यांना देतात ही अतिशय गंभीर आणि निषेधार्ह बाब असल्याचे नायगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांचे पुत्र प्रा. रवींद्र पाटील असे म्हणले की बावनकुळे यांनी पत्रकाराची जाहीर माफी मागावी असे नायगाव फास्ट न्यूज बोलताना सांगितले आहे

ज्या अर्थी भाजपाचे प्रदेशध्याक्ष बावनकुळे यांनी  त्यांच्या कार्यकर्त्यांना असे सल्ले देत आहेत त्या अर्थी त्यांनी स्वतः अशा पद्धतीने काम केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यांना पत्रकारांना निर्भिड पणे काम करु द्यायचे नाही हे भाजपाचे धोरणच आहे

भाजपाने एकतर उघडपणे त्यांना लोकशाही व्यवस्था मान्य नाही हे सांगावे अन्यथा अशी बेजबाबदार विधाने केल्या बद्दल पत्रकारांची आणि जनतेची माफी मागावी‌ असे आवाहन यूवा नेते प्रा.रविंद्र चव्हाण.यांनी केले आहे

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तथा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी राज्य घटनेत पत्रकारांना चौथा आधारस्तंभ म्हणून स्थान दिले आहे

अशा लोकशाहीतील पत्रकारांना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी आपल्या राजकीय घमेंडीतून पत्रकारांच्या संदर्भात गरळ ओखली असल्यामुळे राज्यातील पत्रकारात संतापाची लाट पसरली असल्यामुळे आता लोकशाही मार्गाने ओखलेली गरळ पत्रकारांच्या लेखणी मधून धो धो धुतली जाणार आहे

भाजपा पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानामुळे खळबळ उडाली असून भाजपाच्या विरोधात पत्रकारांनी बातम्या छापू नयेत म्हणून पदाधिकाऱ्यांनी ढाब्यावर पत्रकारांना चहा प्यायला न्यावं  जेवायला न्याव असी गरळ भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी ओखली  आहे

याबाबतची एक ऑडिओ क्लिप शोषियल मीडियावर व्हायरल झाल्या नंतर विविध राजकीय नेत्यां कडून चंद्रशेखर बावनकुळेंसह भाजपावर टीका केली जात आहे





Post a Comment

0 Comments