Header Ads Widget

आमदाराच्या धमकीमुळे पोलीस विभागात खळबळ पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी विना नंबरची गाडी लावली होती पोलीस ठाण्यात !!

         माधव पवार
लोहा कंधार मतदारसंघाचे आमदार तथा माजी राजपत्रित अधिकारी श्यामसुंदर शिंदे यांनी स्थानिक नगरसेवक याची मोटर सायकल का ? पकडली त्या मोटार सायकलला आताच्या आताच सोडा अन्यथा तुमच्या विरोधात विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थितीत करून तुमच्यासह वरिष्ठांना निलंबीत करण्याची धमकी दिली आहे
पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी लोहा शहरात राबवित असलेल्या धडक मोहिमे अंतर्गत करत असलेल्या कारवाई दरम्यान भल्या भल्याची झोप उडत असल्याची चर्चा होताना ऐकावयास मिळत असून सदरची मोहीम अशाच पद्धतीने पुढे चालू राहणार आहे

या कारवाईत माझ्या काकाची माझ्या मामाची गाडी माझ्या दोस्ताची गाडी अथवा माझ्या कार्यकर्त्याची गाडी असल्याचे सांगुन पोलीसावर दबाव आण्याचा कोणी ही प्रयत्न करू नये असे दबंग पो.नि. चिंचोलकर यांनी सांगितले आहे 

पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांच्यासह फौजदार हलसे याना धमकी दिल्यामुळे पोलीस विभागात खळबळ उडाली असल्यामुळे सदरची गंभीर बाब संबंधित पोलीस अधिकारी यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकारी यांना कळवली असल्याचे समजते आहे

पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर याना शासकीय विश्रामगृह येथे आमदार श्याम सुंदर शिंदे यांनी बोलावून अनेक वेळा कायद्याचे नियम सांगून कायदेशीर आधार किंवा लेखी नाही तुम्हा पोलिसांना वाहने अडवण्याचा अधिकार नाही असे बोलत होते

माजी परिवहन आयुक्त होतो मलाच नियम कळतात हे दर्शवण्यासाठी दबाव आणून वाहने सोडण्याचा राजकीय दबाव टाकत होते असे पोलीसाचे म्हणे आहे


Post a Comment

0 Comments